सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील छोट्या गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि गेल्या पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे यांनी संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आधीच्या पर्वाला प्रेक्षकांचा मिळालेला भरगोस प्रतिसाद आणि कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून झी मराठी तब्बल १२ वर्षांनी लिटिल चॅम्प्सच नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले.
रसिकांचे लाडके पंचरत्न या नवीन पर्वात या छोट्या गायक मित्रांचे ताई दादा म्हणजेच ज्युरीच्या भूमिकेत दिसत आहेत. पंचरत्न तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं नवीन पर्वातून रसिकांच्या भेटीला आले. या शोच्या सुरुवातीपासूनच काही ना काही कारणावरुन नेटीझन्स पंचरत्नांना ट्रोल करत होते. या शोमध्ये पहिल्यांदाच पचंरत्न जजच्या भूमिकेत झळकत आहेत. अनेकांनी इतक्या लहान वयात जजच्या खुर्चीत त्यांना बसवले असे म्हणत ट्रोलही केले होेते.
स्पर्धक चांगले आहेत पण जजच जरा ओव्हर एक्टींग करतात असेही म्हणत त्यांची खिल्ली उडवली गेली. मेजशीर मिम्सही व्हायरल केले गेले. नेटीझन्स इथवरच थांबले नाही तर त्यांनी सुत्रसंचालन करणारी मृण्मयीवरही निशाणा साधला होता. तिच्यावरही कमेंट करत तिलाही ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले होते.
आता पुन्हा एकदा पंचरत्न नेटीझन्सच्या निशाण्यावर आले आहे. ''बचपन का प्यार है'' या ट्रेडिंग गाण्यावर पंचरत्नांनीही खास व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ शेअर होताच पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. शोच्या जजेसना असे व्हिडीओ करणे शोभत नाही, तुम्ही अजून लहानच आहात,चला न्यु मिम्स मटेरिअल आलं असे कमेंट करत युजर्स त्यांची खिल्ली उडवत आहेत.
एकीकडे व्हिडीओला नापसंती देत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या या व्हिडीओला लाईक्स करणारे चाहते पसंतीही देत आहेत. सध्या लिटील चॅम्प्सच्या या पंचरत्नांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचडं व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.