Join us

हृतिकच्या Ex पत्नीच्या वाढदिवशी अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट, सुजैनसोबतचा फोटो शेअर करत सबा म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 13:28 IST

हृतिकची Ex पत्नी सुजैन खानचा आज वाढदिवस आहे. सुजैनच्या वाढदिवशी अभिनेत्याची गर्लफ्रेंड सबा आजादने पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणारा हा हँडसम हंक त्याच्या बॉलिवूड करिअरपेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असतो. हृतिकची Ex पत्नी सुजैन खानचा आज वाढदिवस आहे. सुजैनच्या वाढदिवशी अभिनेत्याची गर्लफ्रेंड सबा आजादने पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

सबाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सुजैन खानसाठी पोस्ट शेअर केली आहे. एका पार्टीतील फोटो सबाने शेअर केला आहे. या फोटोत सबा, हृतिक रोशन, सुजैन खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलानल दिसत आहे. हा फोटो शेअर करत सबाने सुजैनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला तिने "हॅपी बर्थडे सूझालो...नेहमी हसत राहा", असं कॅप्शन दिलं आहे. 

दरम्यान, हृतिक आणि सुजैनने २००० साली लग्न केलं होतं. लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना रिहान आणि हृदान ही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर हृतिक सबासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर सुजैन अर्सलानल डेट करत आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खान