Join us

कॅप्टन दिलीप दोंदे आणि अभिनेता जितेंद्र जोशी खेळणार ज्ञानाचा खेळ 'कोण होणार करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:55 IST

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर या आठवड्यात २४ जुलैच्या कर्मवीर विशेष भागात ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे आणि त्यांच्याबरोबर अवलिया अभिनेता जितेंद्र जोशी हे येणार आहेत. कॅ

'कोण होणार करोडपती'मध्ये गेल्या कर्मवीर विशेष भागात पद्मश्री नाना पाटेकर हॉटसीटवर आले होते. त्यांनी एकूण २५ लाख एवढी रक्कम जिंकून रंगकलामंच कलाकारांना दिली. या आठवड्यात २४ जुलैच्या कर्मवीर विशेष भागात ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे आणि त्यांच्याबरोबर अवलिया अभिनेता जितेंद्र जोशी हे येणार आहेत.

कॅप्टन दोंदे हे रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत आणि ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी समुद्रातून  विश्वभ्रमंती केली आहे. त्यांच्या सागर परिक्रमा या प्रकल्पांतर्गत स्वतः बोट बनवून त्यांनी एकट्याने ही सफर केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी हा एक उत्तम नट, कवी आणि लेखकही आहे. समाजाची जाण असलेला हा कलाकार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर खेळणार आहे. 

हॉटसीटवर कॅप्टन दोंदे यांनी आपल्या सागर परिक्रमेचे अनेक रोमांचक किस्से सांगितले. जितेंद्रनेही आपली एक कविता या वेळी वाचून दाखवली. गप्पा, कविता, ज्ञान आणि समाजाला आपण काहीतरी देण्याची जाण, या सगळ्यांमुळे हा कर्मवीर विशेष भाग फार छान जमून आला आहे. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता कॅप्टन दोंदे आणि जितेंद्र जोशी नेमकं कोणासाठी खेळणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. 

  

टॅग्स :सचिन खेडेकरजितेंद्र जोशी