Join us

मुनव्वर फारुकीच्या बॉलवर सचिन तेंडुलकर 'आऊट', अशी होती क्रिकेटच्या देवाची रिॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 2:04 PM

मुनव्वर फारुकीच्या बॉलवर त्याने शॉट मारला. मात्र तो कॅच आऊट झाला.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मैदानावर आऊट करणं तसं कठीणच. पण ही करामत केलीये मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) . बिग बॉस 17 चं विजेतेपद पटकावल्यानंतर मुनव्वर चांगलाच चर्चेत आहे. आधी स्टँडअप कॉमेडी, वादग्रस्त कमेंट्स यामुळे तो चर्चेत असायचा. मात्र बिग बॉसमुळे त्याच्या चाहतावर्गात वाढ झालेली दिसत आहे. काल इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मैदानात आले होते. सर्वांमध्ये फ्रेंडली सामने खेळले गेले. तेव्हा मुनव्वर फारुकीच्या बॉलवर सचिन तेंडुलकर आऊट झाला. तेव्हा स्टेडियममध्ये माहोल पाहण्यासारखा होता.

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देवच. त्याला काल स्टेडियमवर बॅटिंग करताना पाहून क्रिकेटप्रेमींना खूप आनंद झाला. ३० रन बनवून जेव्हा सचिन आऊट झाला तेव्हा मात्र स्टेडियममध्ये शांतता पसरली. मुनव्वर फारुकीच्या बॉलवर त्याने शॉट मारला. मात्र तो कॅच आऊट झाला. यानंतर सचिनच्या चेहऱ्यावर स्माईल होती. हसत हसतच तो मैदानातून बाहेर गेला. तर इकडे मुनव्वरच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. हा सामना सचिन तेंडुलकरच्या मास्टर्स इलेवन आणि अक्षय कुमारच्या खिलाडी इलेव्हनमध्ये झाला. १० ओव्हर्सची ही मॅच होती. सचिनने १७ चेंडूत ३० धावा केल्या. अखेर सचिनचीच टीम मॅच जिंकली. मास्टर्स इलेव्हनने ९४ रन काढले, तर अक्षयच्या खिलाडी टीमला ८९ धावा करता आल्या. ५ धावांनी त्यांचा पराभव झाला. 

ISPL टी ११ च्या ओपनिंग सेरेमनीलाही धमाल आली होती. बोनी कपूर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, रामचरण यांनी नाटू नाटू गाण्यावर डान्स केला होता. सचिन तेंडुलकर ISPL चा ब्रँड अँबेसिडर आहे. ६ मार्च ते १५ मार्च दरम्यान सामने खेळवले जाणार आहेत.

टॅग्स :सचिन तेंडुलकरबिग बॉससोशल मीडिया