Join us

सदाशिव अमरापूरकर कालवश

By admin | Published: November 03, 2014 12:00 AM

याशिवाय इश्क आंखे कुली नं १ गुप्त अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. रंगभूमीवरील हँड्स अप या ...

याशिवाय इश्क आंखे कुली नं १ गुप्त अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. रंगभूमीवरील हँड्स अप या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.अमरापूरकर यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

१९९१ मध्ये सडक या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कारही अमरापूरकर पटकावला.

१९८४ मध्ये प्रदर्शित झालेली अर्धसत्य हा त्यांचा पहिला वहिला हिंदी सिनेमा. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

हिंदी मराठी सिनेमा आणि रंगभूमी अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या चतुरस्त्र अभिनयाची मोहोर उमटवणारे सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म अहमदनगरमध्ये झाला होता.पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केल्यावर अमरापूरकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.

दमदार अभिनयामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. अमरापूरकर यांना गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या संसर्गाने ग्रासले होते. यासाठी त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.