Join us

लेकीच्या जन्मानंतर सई लोकूरचा मोठा निर्णय; काही काळासाठी घेतला सोशल मीडियातून ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 13:10 IST

sai lokur: सईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचा निर्णय नेटकऱ्यांना सांगितला आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात झळकलेली अभिनेत्री सई लोकूर (sai lokur) नुकतीच आई झाली आहे. १७ डिसेंबर रोजी सईने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला.  त्यामुळे तिच्या बाळाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. यामध्येच आता सईने एक महत्त्वाचा निर्णय घेतलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या निर्णयामुळे सगळेच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सईने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा निर्णय सांगितला आहे. तिच्या या निर्णयानुसार, आता ती सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.

नेमकं काय म्हणाली सई?

सईने इन्स्टाग्राम  शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेत असल्याचं सांगितलं आहे.  'बाळ ठणठणीत आणि सुंदर असून जगात येण्याआधीपासूनच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होतोय. तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. आता आराम करायची वेळ झालीये. पण, मी पुन्हा येईन', असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सईने तिचा प्रेग्नंसी काळ चांगलाच एन्जॉय केला होता. या काळातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे तिचा प्रेग्नंसी पिरीअड चांगलाच चर्चेत राहिला होता. 

टॅग्स :सई लोकूरबिग बॉस मराठीसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार