अन् केवळ तत्त्वांसाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:00 PM2019-04-21T16:00:00+5:302019-04-21T16:00:03+5:30

फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आणि या जाहिरातील सेलिब्रिटींचे चेहरे आपल्याला नवे नाहीत. हे सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. अर्थात याला काही अपवादही आहेत.

Sai Pallavi rejects fairness cream ad deal worth Rs 2 crore? | अन् केवळ तत्त्वांसाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात!

अन् केवळ तत्त्वांसाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात!

googlenewsNext
ठळक मुद्देसाई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.

फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आणि या जाहिरातील सेलिब्रिटींचे चेहरे आपल्याला नवे नाहीत. हे सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. अर्थात याला काही अपवादही आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका साई पल्लवी ही त्यापैकीच एक. होय, एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी साई पल्लवीला २ कोटी रूपये इतके मानधन मिळणार होते. पण तत्त्वांपुढे पैसा महत्त्वाचा नाही, असे म्हणून साईने म्हणे या २ कोटी रूपयांवर पाणी सोडले.


चित्रपटांतही कमीत कमी मेकअप करणारी अभिनेत्री म्हणून साई पल्लवी ओळखली जाते. खऱ्या आयुष्यातही ती अगदी क्वचित सौंदर्य प्रसाधनांचा वापर करते. त्यामुळे केवळ पैशांसाठी फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास तिने नकार दिला. खुद्द साईने याबद्दल माहिती दिली. ‘मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगलाच पाहिजे’, असे तिने सांगितले.


साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. आता तत्त्वांसाठी जगणारी अभिनेत्री अशी तिची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे.

Web Title: Sai Pallavi rejects fairness cream ad deal worth Rs 2 crore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.