बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आपल्या सोशल मीडियावरून फक्त त्यांच्या पोस्ट करण्यात आणि हात धुणे शिकवण्यात व्यस्त असताना मराठी सिनेसृष्टीतील एरव्ही फक्त ग्लॅम डॉल म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री यावेळी मात्र हिरो म्हणून समोर आल्या आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एकानंतर एक पुढे येणारे दाक्षिणात्य आणि बॉलिवूड कलाकार आपल्या पद्धतीने मदत जाहीर करत आहेत. आता याच पाठोपाठ मराठी अभिनेत्री देखील मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
अभिनेत्री दीपाली सैय्यदने कोरोनाग्रस्तांना जीवानाश्यक वस्तूसाठी ५० लाख दिले आहेत, अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने गुप्त निधी दिला आहे तर सई ताम्हणकरने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १.५ लाख रुपये जमा केले आहेत. अशाप्रकारे मराठी तारका कोरोना संकटात पुढे येत लाखोंचा निधी मदतीसाठी देत आहेत. हा पैसा लॉकडाउनमुळे उपाशी राहणाऱ्यांसाठी वापरण्यात यावा असा संदेशही त्यांनी दिला आहे.
त्यामुळे मराठी अभिनेत्रींचे हे काम पाहून तुम्हालाही कौतुकास्पद वाटलेच असणार. कठीण परिस्थितीत आपण सोशल कॉन्टॅक्टशिवाय एकमेकांना मदत करा आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एकमेकांचे मनोबल वाढवा असा संदेशच या मराठी अभिनेत्री देत आहेत.
देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला असला तरी करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून मराठी कलासृष्टीकडूनही लोकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करत आहेत.स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, रवी जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सचिन पिळगावकर, अवधुत गुप्ते, अभिजीत खांडकेकर हे सर्व कलाकार जनजागृती करताना पाहायला मिळत आहेत. जवळपास साडेतीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक कलाकाराने चाहत्यांना नम्र आवाहन केले आहे.