Join us

सई ताम्हणकरला 'ह्या' सिनेमाच्या चित्रीकरणावेळी आले होते फ्रस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 6:36 PM

तबरेज नुरानी दिग्दर्शित 'लव सोनिया' सिनेमामध्ये सई ताम्हणकर अंजली ह्या देहविक्री व्यवसायातल्या बाईच्या भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे'लव सोनिया' चित्रपटात सई दिसणार अंजलीच्या भूमिकेतसईला अंजलीच्या भूमिकेसाठी करावी लागली खूप मेहनत

तबरेज नुरानी दिग्दर्शित 'लव सोनिया' सिनेमामध्ये सई ताम्हणकर अंजली ह्या देहविक्री व्यवसायातल्या बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सईला खूप मानसिक ताण आला होता. ती ही भूमिका रंगवताना बऱ्याचदा फ्रस्ट्रेट झाली होती.

याबाबत सई ताम्हणकर सांगते की, ''लव सोनिया' सिनेमामूळे देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बायकांच्या व्यथा मला खऱ्या अर्थाने समजल्या. इथे पकडून आणलेल्या लहान मुलांना कसे गुलाम बनवले जाते, ते कळले. त्यांना छोट्या पिंजऱ्यात दोन-दोन दिवस अन्न-पाण्याविना बंद करून ठेवतात. हे सगळे अंगावर शहारे आणणारे व प्रचंड मानसिक वेदना देणारे होते.' सई पूढे सांगते, ''लव सोनिया'तली अंजली मुली पूरवण्याचे काम करते. ती सतत नकारात्मक वातावरणातच राहते. त्याचा अर्थातच कळत-नकळत माझ्याही मनावर परिणाम झाला होता. मला ही भूमिका रंगवताना खूप फ्रस्ट्रेशन यायचे. माणसे एवढी कशी वाईट असू शकतात?  मी एखाद्या व्यक्तिशी किती वाईट वागतेय? असे वाटायचे.'या फ्रस्ट्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी सईने म्युझिक थेरपीचा आधार घेतला. ती म्हणते, 'संगीत एक खूप चांगले औषध आहे. आनंददायी संगीत तुम्हांला मानसिक ताणातून बाहेर आणायला. खूप मदत करते.''लव सोनिया' सिनेमातली अंजलीची व्यक्तिची भूमिका करताना सईला खूप तयारी करावी लागली. ती म्हणाली, 'आजपर्यंत मी रंगवलेल्या भूमिकांपेक्षा अंजली खूपच वेगळी होती. अशा महिलांना मी कधीही भेटलेही नव्हते. त्यांची देहबोली आत्मसात करताना काही निरीक्षणे आणि संशोधन केले. मला साडी नेसायची होती. ह्या व्यवसायात असलेल्या स्त्रिया जेव्हा साडी नेसतात तेव्हा त्यांच्या पोटाकडचा आणि पाठीकडचा भाग उघडा असतो. ब्लाउज ब-याचदा व्यवस्थित फिटींगचे नसतात. आणि त्यातून त्यांचे जागरणे किंवा अवेळी जेवणाने वाढलेले वजन प्रकर्षाने दिसून येत असते, हे उमगले.

 

टॅग्स :सई ताम्हणकरलव्ह सोनिया