Join us

आज कुछ तूफानी करते हैं! सई ताम्हणकरनं केलं पॅराग्लायडिंग, शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 18:36 IST

सई ताम्हणकरने पॅराग्लायडिंग करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Sai Tamhankar Paragliding Video: मराठी सिनेसृष्टीतील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) एक आहे. सईने आतापर्यंत अनेक गाजलेल्या सिनेमामधून प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. इतकच नव्हे तर तिने बॉलिवूड आणि ओटीटीवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे सई ताम्हणकर हे सध्या बॉलिवूडमध्येही आघाडीचं नाव झालं आहे. सईला कायम नव-नवीन गोष्टी शिकायला आवडतात. नुकतंच सईनं पॅराग्लायडिंग केलं आहे. 

सईने हटके स्टाइलने नववर्षाची सुरूवात केली होती. साहसपूर्ण पॅराग्लायडिंगचे फोटो तिनं शेअर केले होते. आता सईनं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "प्रेरणा, शोध, धाडस, परिवर्तन. तुम्ही जसे आहात तसेच राहणं नेहमीच मुक्तता देणारं असतं! सर्वात समाधानकारक, मोहक आणि रोमांचक प्रवास". 

या व्हिडीओमध्ये 'मी थोडीशी घाबरेलेली आहे', असं म्हणताना सई दिसतेय. तर समोरून व्यक्ती म्हणतो की "थोडसं घाबरणं चालतं, पण जास्त घाबरणं चांगलं नाही". यानंतर सई मोठ्याने ओरडताना दिसतेय. सोलो फ्लाइटसाठी सईच्या मनात धाकधूक दिसतेय.  पण, त्यानंतर अवकाशात झेप घेताच तिचा आनंद ओसांडून वाहताना दिसतोय. सईच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिच्या साहसाचं कौतुक केलं आहे.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील कार्यक्रमात हास्यरसिक या भूमिकेत दिसते.  'मानवत मर्डर्स' या सीरिजमध्ये  सई पाहायला मिळाली होती. यात तिने समंद्रीची भूमिका साकारली होती. या सीरिजला आणि सईच्या पात्राला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आगामी काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. यात ग्राउंड झिरो, डब्बा कार्टेल या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे

टॅग्स :सई ताम्हणकरपॅराग्लाइडिंग