बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukharjee) मोजक्याच सिनेमात एकत्र दिसले होते. पण जेव्हाही ते पडद्यावर दिसले तेव्हा त्यांची केमिस्ट्री फॅन्सना फारच आवडली होती. आता बऱ्याच वर्षांनी दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'बंटी और बबली २' (Bunty aur Babli 2) मध्ये दोघे सोबत दिसणार आहेत.
सैफने किस करू नये अशी होती राणीची इच्छा
'बंटी और बबली 2' (Bunty aur Babli 2) च्या प्रमोशन दरम्यान दोघांनी 'हम तुम' सिनेमाच्या शूटींगच्या आठवणी ताज्या केल्या. त्यांनी सांगितलं की, कशाप्रकारे किसींग सीनबाबत दोघेही नर्व्हस होते. सैफ अली खानने खुलासा केला की, राणी त्याला या गोष्टीसाठी मनवलं होतं की, त्याने दिग्दर्शकाला सांगावं की, त्याला राणीला किस करायचं नाहीये.
इच्छा नसूनही शूट झाला किसींग सीन
यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये बोलताना राणी मुखर्जीने सैफला विचारलं की, 'तुला आठवतं का की, किसींग करण्यासाठी आपण किती घाबरलेलो होतो'. ज्यावर सैफ म्हणाला की, 'मला आठवतं की, त्या शॉटबाबत तू किती जास्त घाबरलेली होती'.
सैफ म्हणाला इतिहासातील सर्वात वाईट किस
सैफ अली खान म्हणाला की, राणीने जेव्हा त्याला सांगितलं की, त्याने दिग्दर्शकाला या सीनसाठी नकार द्यावा. तर तो म्हणाला की, मी असं नाही करू शकत. माझ्या बॉसने मला असं करण्यासाठी सांगितलं आहे. दोघांनीही नंतर हा सीन केला होता. पण सैफने सांगितलं की, 'हा सिने जगताच्या इतिहासातील सर्वात वाईट किसींग सीन होता'.