नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. सैफ अली खान अलीकडेच 'विक्रम वेध'मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. सैफ अली खानचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी खूप चर्चेत होता, मात्र त्यानंतर हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही आणि फ्लॉप ठरला. आता याच दरम्यान सैफ अली खानची एक मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये सैफ अली खानने चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. या मुलाखतीवरून आता सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
सैफ अली खानने टोचले सेलिब्रेटींचे कान बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा पती अभिनेता सैफ अली खान एका मुलाखतीमुळे सध्या चर्चेत आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्याने बिग बजेट चित्रपटांच्या फ्लॉपवर आपले मत मांडले. सैफ अली खानने म्हटले, बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपटांची खराब कामगिरी खूपच निराशाजनक आहे. खरं तर 'विक्रम वेध'सारखा चित्रपट फ्लॉप झाल्याने सैफला खूप आश्चर्य वाटले. यानंतर त्याने सेलिब्रेटींच्या मानधनावर आपले परखड मत मांडले. बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई का करत नाहीत, असा प्रश्न सैफला विचारण्यात आला. याला उत्तर देताना सैफ अली खान म्हणाला की, यामागे काहीतरी कारण असावे. कारण मागील बऱ्याच काळापासून चित्रपट बनत आहेत. स्टार्सच्या फीमध्येही बदल होताना दिसत आहेत. पण काही स्टार्स अद्यापही जास्त मानधन आकारत आहे, परंतु परतावा तितका चांगला नाही. असे सैफ अली खानने अधिक म्हटले.
...म्हणून सोशल मीडियापासून दूर राहतो सैफ सैफ अली खानने सोशल मीडियापासून दूर राहण्याचे कारण सांगितले आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, माझ्याकडे असे अनेक फोटो आहेत जे मी शेअर करू शकतो, परंतु लोक म्हणतील की हे शेअर करू नको ते शेअर करू नको. याशिवाय अनेक कारणांमुळे मला या त्रासात पडायचे नाही असे सैफने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"