Join us

करीनाच्या आधी या मॉडेलसोबत सैफ होता रिलेशनशीपमध्ये, अमृतासोबतच्या घटस्फोटासाठी हीच कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:10 PM

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) फक्त प्रोजेक्टसाठी नाही तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे.

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) फक्त आगामी प्रोजेक्टसाठी नाही तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. त्याने वयाने १२ वर्षे मोठी असणाऱ्या अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh)सोबत लग्न केले होते. त्यावेळी सैफ फक्त २० वर्षांचा होता. मात्र सैफ आणि अमृताचे रिलेशन जास्त काळ टिकू शकले नाही आणि दोघांनी लग्नाच्या १३ वर्षांनंतर २००४ साली घटस्फोट घेतला. सैफ अली खान आणि अमृता सिंगला दोन मुले आहेत सारा (Sara Ali Khan) आणि इब्राहिम (Ibrahim Ali Khan). अमृता आणि सैफच्या घटस्फोटासाठी करीना कपूर (Kareena Kapoor) जबाबदार नसून इटालियन मॉडेल कारणीभूत असल्याचे बोलले जाते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंग आणि सैफ अली खान विभक्त होण्यामागे सर्वात मोठे कारण रोजा कैटलानोसोबत सैफचे असलेले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जबाबदार असल्याचे बोलले जाते. २००४ साली सैफ आणि रोजाची भेट केन्या येथे झाली होती. सैफचे मॅरिड लाइफ त्यावेळी खूप नाजूक परिस्थितीतून जात होते. त्यावेळी सैफ आणि अमृतामध्ये खूप वाद होत होते. रोजाला भेटल्यानंतर सैफचे तिच्यावर प्रेम जडले होते.

सैफ आणि रोजाचे अफेअर अमृता सिंगपासून फार काळ लपले नाही. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर अमृताला सैफसोबत राहणे मंजूर नव्हते. तर सैफला रोजामुळे अमृतापासून विभक्त व्हायचे होते. २००४ साली ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर रोजा सैफसाठी केन्या सोडून मुंबईत आली. सैफने रोजाला देखील फसविले होते आणि ते तिला मुंबईला आल्यावर समजले.

सैफने २०१२ साली केले करीना कपूरसोबत लग्नएका मुलाखतीत रोजाने सांगितले होते की सैफने तिच्यापासून पहिले लग्न आणि मुलांबद्दल लपवून ठेवले. रोजाला सैफचे लग्न, मुले आणि घटस्फोटाबद्दल भारतात आल्यानंतर समजले होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यावेळी सारा केवळ १० वर्षांची होती तर इब्राहिम ४ वर्षांचा होता. २००४ साली अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफने २०१२ साली करीना कपूरसोबत विवाह केला. आता त्या दोघांना दोन मुलं आहेत तैमुर आणि जेह. 

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंगकरिना कपूरसारा अली खानइब्राहिम अली खान