Join us

लग्नाआधी करिनाने मोठ्या नणंदेला पाठवला होता खास मेसेज, फोटो पाहून बेबोलाही आवरले नसणार हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 13:48 IST

करिना आणि सैफ यांच्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सबानेच करिनाची ही गोड आठवण सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे.

वयाने सैफ करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे.सैफ नवाबच्या घराण्यातून होता. सैफशी लग्न करुन करीना बेगम बनणार होती. त्यामुळे सासरच्या मंडळींसह तिला  चांगले नाते निर्माण करायचे होते. नवाब घराण्याची सून बनणार असल्याचे दडपण करिनालाही आले असणाच म्हणून आधी सगळ्यांसोबत चांगले नाते निर्माण व्हावे यासाठी करिना धडपड करायची.याची सुरुवात तिने तिच्या मोठ्या नणंदेपासूनच केली होती.

लग्नाआधी करिनाने मोठी नणंद सबा अली खानला एक खास  ग्रीटिंग पाठवले होते.या  ग्रीटिंगवर  खास मेसेजही तिने लिहून पाठवला होता.प्रिय सबा मला तुला जाणून घ्यायला खूप आवडेल, खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा. हा मेसेज वाचून सबालाही आनंद तर झाला असणारच पण थोडे करिनाविषयी कौतुकही वाटले असणार. 

करिना आणि सैफ यांच्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सबानेच करिनाची ही गोड आठवण सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. सोशल मीडियावर सबा प्रचंड सक्रीय असते. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासोबतचे खास फोटो ती शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसते. नेहमीच तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनाही सबाचे कौतुक वाटते. सबा कधीच लाइमलाईटमध्ये नसल्यामुळे सैफच्या मोठ्या बहिणीविषयी फारसे लोकांना माहिती नाही.

आज पटौडी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, करीना कपूर आणि आता सारा अली खान या सगळ्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.पण पटौडी कुटुंबातलीच सदस्य असनूही सबाला फारसे चर्चेत राहायला आवडत नाही.

घरातला प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडशी संबंधीत असला तरी सबाचा मात्र  बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत कोणताच संबंध नाही. सबा अली खान सैफपेक्षा छोटी आणि सोहापेक्षा मोठी आहे. सैफ आणि सोहा यांच्यामध्ये अभिनय कौशल्य त्यांची आई शर्मिला टागौर यांच्याकडून मिळालं आहे. मात्र सबा पहिल्यापासूनच लाइमलाइटपासून दूर आहे. त्यामुळेच तुम्ही तिच्याबद्दल फारसं जास्त काही ऐकायला मिळत नाही. 

टॅग्स :करिना कपूरसबा खान