Join us

चेहऱ्यावर थकवा, हातात पतीचा फोटो, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिसल्या सायरा बानो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 4:21 PM

'मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है'', असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय.

अभिनेत्री सायरा बानो  यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णायलयातून बाहेर आल्या त्यावेळी त्यांच्या हातात दिलीप कुमार यांचा फोटो होता. चेहऱ्यावर थकवाही दिसत होता. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो एकट्या पडल्या आहेत. दिलिप कुमार यांच्या निधनाच्या धक्यातून त्या अजूनही सावरलेल्या नाहीत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्या मीडियासमोर आल्या होत्या. सायरा बानो 77 वर्षांच्या आहेत.

1966 साली दिलीप आणि सायराबानू यांनी विवाह केला होता.दिलीप आणि सायरा बानो यांची  आदर्श जोडी म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जाते. दोघांच्या वयातही 22 वर्षांचे अंतर होते. तरीही त्यांच्या प्रेमात वयाचा फरक नात्यामध्ये येऊ शकला नाही. याउलट दोघांचे नाते दिवसेंदिवस घट्ट बनत गेले होते.  

सायरा बानो नेहमीच दिलीप कुमार यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.  56 वर्षं सतत दिलीप कुमार यांच्यासोबत सावलीसारख्या वावरत होत्या. खंबीरपणे त्यांची  साथ दिली. गेल्या काही वर्षांत दिलीप कुमार अंथरूणावर होते. सायरा यांनी त्यांची अगदी लहान मुलासारखी काळजी घेतली. दिलीप कुमार यांची शेवटपर्यंत सायरा बानो यांनी साथ सोडली नाही.

आजारपणात त्यांची तितकीच काळजी घेतली. त्यांचा संपूर्ण वेळ त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतच घालवला. हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजिडी किंग अभिनेते दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी निधन झाले. दिलीप कुमार यांच्या निधनाने मात्र सायरा बानो आज एकट्या पडल्या आहेत. त्या ना कोणाला भेटतं, ना कोणाशी बोलतात. याचा त्यांच्या तब्येतीवरही परिणाम झाला आहे.'

'मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है'', असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही. तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही.

मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत, असे सायरा बानो एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

टॅग्स :सायरा बानूदिलीप कुमार