आपल्या सौंदर्यानं , अभिनयानं घायाळ करणारी आणि लाखो तरूणांच्या गळ्यातील असणारी चुलबुली अभिनेत्री म्हणजे सायरा बानो. सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944मध्ये मसूरी येथे झाला. सायरा बानो यांचं नाव जरी काढलं तरी अजाणतेपणे त्यांची आणि दिलिप कुमार यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वांमध्ये सुरू होतात. सायरा बानो यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात सायरा बानो यांच्या आयुष्याला वळण देणारं हे प्रकरण नक्की आहे तरी काय...
सायरा बानो यांच्या प्रोफेशनल लाइफप्रमाणेच त्यांचं खरं आयुष्यही तेवढचं इटरेस्टिंग आहे. सायरा चक्क 22 वर्षांच्या असताना त्यांच त्यांच्या वयापेक्षा चक्क दुप्पट वय असणाऱ्या आणि बॉलिवूडमध्ये सुपरस्टार असणाऱ्या दिलीप कुमार यांच्यावर जीव जडला होता. सायराने दिलीप कुमार यांना पाहताच क्षणी ठरवलं होतं की, लग्न करेल तर यांच्याशीच.
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात जुन्या जोड्यांपैकी एक आहे. सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना मात्र त्यांच्या आणि सायरा यांच्यात असणाऱ्या वयाच्या अंतराबाबत ठाऊक होतं. लग्न करण्यासाठी अडून बसलेल्या सायराची समजूत घालण्यासाठी दिलीप सायराला म्हणालेही होते की, तू माझे पांढरे केस पाहिले आहेत का? पण सायराने दिलेल्या उत्तरावर दिलीप यांच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. त्यानंतर दिलीप यांनीही सायरा यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला.
काही दिवसांनी मात्र या दोघांच्या प्रेमाला ग्रहण लागलं. 1980मध्ये दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न केलं. तेव्हा अशा चर्चांनी जोर धरला होता की, सायरा आई होऊ शकत नाही म्हणून दिलीप यांनी दुसरं लग्न केलं. सुरू असलेल्या या चर्चा आणि दिलीप यांनी केलेलं दुसरं लग्न यांमुळे सायरा पुरत्या खचल्या होत्या. असं म्हटलं जातं की, दिलीप यांनी अस्मासोबत मुलासाठी दुसरं लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 1983मध्ये अस्मा आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये घटस्फोट झाला.
सायरा बानो आणि दिलीप कुमार यांना कधीही मुल झालं नाही. याबाबत दिलीप कुमार यांनी आपली ऑटोबायोग्राफी 'द सबस्टांस अॅन्ड द शॅडो' यामध्ये लिहीलं आहे. 1972मध्ये ज्यावेळी सायरा गरोदर होत्या. त्यावेळी 8व्या महिन्यामध्ये सायरा यांना ब्लडप्रेशरचा त्रास होऊ लागला. त्यावेळी बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणं शक्य नव्हतं. अशा क्रिटीकल परिस्थितीमध्ये गुदमरून बाळाचा पोटातच मृत्यू झाला. त्यानंतर सायरा कधीही आई होऊ शकल्या नाही.
एका मुलाखतीत बोलताना सायरा यांनी सांगितलं होतं की, त्या 8 वर्षांच्या असल्यापासूनच दिलीप यांच्यावर प्रेम करत होत्या. 1952मध्ये रिलिज झालेल्या 'दाग' चित्रपटात दिलीप यांना पाहताच क्षणी त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या.