Join us

अगदी सेम टू सेम! नागराज मंजुळेंचा डुप्लिकेट पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:42 AM

Nagraj manjule: गेल्या काही वर्षांमध्ये नागराज यांच्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे त्याची ही नवीन स्टाइल अनेक तरुण कॉपी करताना दिसून येत आहेत.

मराठी कलाविश्वात अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती करुन चर्चेत येणारा दिग्दर्शक, निर्माता म्हणजे नागराज मंजुळे (nagraj manjule). सैराट, पिस्तुल्या, फ्रँडी या सिनेमांनंतर अलिकडेच त्यांचा घर बंदूक बिरयानी हा नवा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. यामध्येच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेला मुलगा हुबेहूब नागराज यांच्याप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये नागराज यांच्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे त्याची ही नवीन स्टाइल अनेक तरुण कॉपी करताना दिसून येत आहेत. यामध्येच एका तरुणाने हुबेहूब त्यांच्याप्रमाणे गेटअप केला आहे. इतकंच नाही तर त्याने घर बंदूक बिरयानीचा एक सीनही थोडक्यात क्रिएट केला आहे. त्यामुळे त्याच्याकडे पाहिल्यावर हे खरोखरच नागराज मंजुळे आहेत की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील तरुणाचं नाव योगेश तवार असं आहे. योगेश एक डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्याने नागराज मंजुळे यांच्या स्टाइलमध्ये बिरयानीची रेसिपी दाखवली आहे.  त्यामुळे त्याचा हा हटके व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यान, या व्हिडीओला 33.4 k पेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर सध्या नेटकरी कमालीच्या कमेंट करत आहेत. "लवकरच भाऊची मराठी फिल्म चित्रपटात एंट्री होणार असं मला वाटतंय", अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

टॅग्स :नागराज मंजुळेसेलिब्रिटीसिनेमा