अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आणि ती चर्चेत आली. पायलने अनुरागवर आरोप केल्यावर बॉलिवूडमधील अभिनेत्री त्याच्या सपोर्टमध्ये समोर आल्या आहेत. अनुरागच्या एक्स वाइफ आरती बजाज आणि कल्कि केकलांने सुद्धा पोस्ट करून त्याला सपोर्ट केलाय. अशात आता अभिनेत्री सैयामी खेरची पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट जूनमधील आहे. तिने लिहिले आहे की, अनुरागने तिला घरी बोलवले होते.
सैयामीने पोस्टमध्ये लिहिले होते की, पहिल्यांदा जेव्हा मी अनुराग कश्यपला भेटले तेव्हा त्याने मला त्याच्या वर्सोवातील घरी बोलवले होते. मी काही बोलणार त्याआधीच तो म्हणाला की, माझे आई-वडिलांना माझ्या सोबत राहतात. चिंता करण्याची गरज नाही. त्यावेळी तो बॉलिवूडमधील बॅड बॉय मानला जात होता. बाहेरील जगानुसार, त्याचं लाइफ ड्रग्स, बायका आणि वाईट गोष्टींमध्ये गुंतलं होतं. पण नंतर मला जे समजलं ते एकदम उलट होतं. त्याचं भारतातील टिपिकल घरासारखंच होतं. आई-वडील न्यूजपेपर वाचत होते, डोरबेल सतत वाजत होती, श्रीलालजी पाहुण्यांसाठी जेवण बनवत होते, एक मांजर घरात इकडेतिकडे फिरत होती आणि अनुराग स्वत:च्या घरात एक शांत कोपरा शोधत होता.
दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपवर घरी बोलवून तिच्यासोबत बळजबरी करण्याचा आरोप लावला आहे. पायलने याबाबत एक व्हिडीओही जारी केलाय. सोबतच काही मुलाखती दिल्या आणि ट्विटही केलं आहे. तिने सांगितले की, अनुरागसोबत त्याची मैत्री फेसबुकवर झाली होती. २ भेटीपर्यंत सगळं ठीक होतं. तिसऱ्या भेटीत अनुरागने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसात तक्रार
माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले आहे. कालच अनुरागने स्वत:वरचे हे सगळे आरोप नाकारले होते. आज त्याच्या वकीलाने एक स्टेटमेंट जारी करत, अनुरागवरचे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यातच अभिनेत्री पायल घोषचे वकील नितीन सातपुते हे अनुराग कश्यपविरोधात आज सायंकाळी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकतात. चित्रपट निर्माते कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे.
कल्किने केला अनुरागला सपोर्ट
सोशल मीडियात सतत अॅक्टिव राहणारी अभिनेत्री कल्किने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'प्रिय अनुराग सोशल मीडियात सुरू असलेल्या या सर्कसला स्वत:वर स्वार होऊ देऊ नकोस. तू तुझ्या स्क्रीप्ट्समधून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढला आहेस. तू तुझ्या पर्सनल लाइफसोबत प्रोफेशनल लाइफमध्येही त्यांच्या सन्मानाची रक्षा केली आहेस. मी याची साक्षीदार आहे. कारण प्रोफेशनल आणि पर्सनल स्पेसमध्ये तू मला बरोबरीची जागा दिली आहे'.
कल्किने पुढे लिहिले की, 'इतकेच काय तर आपल्या घटस्फोटानंतही तू माझ्या सन्मानासाठी उभा राहिला होता. आपण सोबत येण्याआधीपासून मी काम करायला घाबरत होते तेव्हापासून मला सपोर्ट केलाय. काळ वाईट आहे. सगळे एकमेकांना शिव्या देत आहेत आणि खोटे आरोप लावत आहेत. तुला अशात मजबूत राहण्याची गरज आहे'.
हे पण वाचा :
अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....
अनुराग कश्यपच्या सपोर्टसाठी समोर आली राधिका आपटे, म्हणाली - 'तुझ्यासोबत नेहमीच सुरक्षित वाटलं'
पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट
तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली