बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता साजिद खान (Sajid Khan) सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १६ मध्ये स्पर्धक म्हणून पाहायला मिळतो आहे. तो शोमध्ये गेल्यापासून, त्याच्यावर लैंगिक शोषण(Sexual Harrasment)चे आरोप करण्यात आले आहेत. बऱ्याच महिला कलाकार त्यांना त्याच्यासोबत आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगत आहेत. दरम्यान आता मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री जयश्री गायकवाड हिने साजिद खानवर धक्कादायक आरोप केले आहेत.
अभिनेत्री जयश्री गायकवाड म्हणाली की, ५ वर्षांपूर्वी मला कास्टिंग डिरेक्टर एका पार्टीत घेऊन गेले होते. त्यावेळी तिथे माझी साजिद खानची भेट करून दिली. त्याला भेटून मी खूप खूश झाले. त्याने मला सांगितलं की, उद्या माझ्या ऑफिसला येऊन भेट. मी एक चित्रपट बनवतो आहे. कदाचित तुझ्यासाठी काहीतरी असेल.
त्याचा मर्डर करावासा वाटला...तिने पुढे सांगितले की, मी दुसऱ्या दिवशी त्याच्या ऑफिसला गेले. तो तिथे एकटाच होता. मला इकडे तिकडे स्पर्श करू लागला. माझ्यावर घाणेरडे कमेंट्स करू लागला. मला म्हणाला की तू खूप सुंदर दिसते पण मी तुला काम का देऊ? तर मी म्हटलं की, मी अभिनय चांगला करू शकते. त्यावर साजिद म्हणाला की अभिनयाने काम नाही चालत. जे मी सांगेन आणि मी जे करेन ते तुला करावं लागेल. मला खूप राग आला. त्याचा मर्डर करावासा वाटला. पण काय करू..तिथून मी रानिघून आले.
यापूर्वीही साजिद खानवर झालेत आरोपमंदाना करीमी(Mandana Karim), आहाना कुमरा(Aahana Kumra), कनिष्क सोनी(Kanishka Soni) आणि शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra)यांच्यासह अनेकांनी साजिदवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यात कास्टिंगचा भाग म्हणून महिला कलाकारांना नग्न फोटो पाठवण्यास सांगणे, महिला अभिनेत्रींसमोर पॉर्न पाहणे, पार्ट्यांमध्ये त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवणे, महिलांशी अश्लील रीतीने बोलणे असे अनेक गंभीर आरोप आहेत.
जयश्री गायकवाडच्या वर्कफ्रंटबद्दल
जयश्री गायकवाड हिने माझे पती सौभाग्यवती, देवयानी, सुहासिनी आणि अल्टी पलटी या मराठी मालिकेत काम केले आहे. मराठी बरोबर तिने सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेत काम केले आहे. तिने पिचकारी, गस्त या मराठी चित्रपटात तर ये गलती ना हो दोबारा आणि कंजरपूर या हिंदी चित्रपटात काम केले आहे.