Salim Khan On Helen: बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम खान आणि अभिनेत्री हेलन यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. विवाहित असूनही, सलीम खानहेलन यांच्या प्रेमात पडले आणि 1981 मध्ये दोघांनी लग्न केले. आता अनेक वर्षांनंतर सलीम खान यांनी हेलनसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.
अरबाज खानच्या शोमध्ये केला खुलासा
सलमी खान यांचा मुलगा अरबाज खान 'द इनव्हिन्सिबल्स' नावाचा एक नवीन चॅट शो घेऊन येत आहे. या शोमध्ये पहिलेच पाहुणे म्हणून वडील सलीम खान यांना बोलवण्यात आले आहेत. शोच्या पहिल्या एपिसोडचा टीझर समोर आला असून, यामध्ये सलीम खान त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलतांना दिसत आहेत. यातच त्यांनी हेलनसोबतच्या नात्यावर भाष्य केले आहे.
तो एक भावनिक अपघात होताटीझरमध्ये दिसून येते की अरबाज वडीलांना हेलनसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारतो. त्यावर सलमी खान म्हणतात, 'त्यावेळेस ती तरुण होती आणि मीही तरुण होतो. माझा काही चुकीचा हेतू नव्हता. तो एक भावनिक अपघात होता. कोणाचाही होऊ शकतो.' याशिवाय अरबाज सलीम खान यां सलमा खानसोबतच्या प्रेमाबद्दलही विचारतो, त्यावर सलीम म्हणतात, 'आम्ही तेव्हा गुपचूप भेटायचो. मी तिला सांगितले होते की, मला तुझ्या पालकांना भेटायचे आहे.'
यानंतर सलीम खान यांनी सलमा खान यांच्या पालकांशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. ते सांगतात, 'मी गेलो तेव्हा सगळे मला भेटायला आले. प्राणिसंग्रहालयात जणू काही नवीन प्राणी आला आहे, अशा रितीने ते माझ्याकडे पाहू लागले.' याशिवाय सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यापासून वेगळे होण्यावरही चर्चा केली.