Join us

सलमान-अजयच्या मैत्रीत दरार....

By admin | Published: September 28, 2016 9:01 PM

अजय देवगण आणि सलमान खान या जिवलाग मित्रामध्ये कटुता होण्याची शक्यता आहे. पुढिल वर्षी दिवाळीत सलमान आणि अजयचे चित्रपट एकमेंकासमोर येण्याची शक्यता बॉलिवूडच्या वर्तुळात रंगत आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 - सेलिब्रिटी वॉर आणि ट्विटरवरील भांडणे हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाही. पण 2017 मध्ये अजय देवगण आणि सलमान खान या दोन जीवलग मित्रांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. कारण पुढील वर्षी दिवाळीत सलमान आणि अजयचे चित्रपट एकमेकांसमोर येण्याची शक्यता बॉलिवूडच्या वर्तुळात रंगत आहे. दोन महत्वाकांक्षी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतील तर ब-याच वेळा मोठ्या पडद्यावर युद्ध छेडले जाते, असाच प्रकार घडण्याची शक्यता आहे.

'अंदाज अपना अपना' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल दिवाळीत येत आहे. यामध्ये सलमान आणि आमीर खानचं मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे वृत्त आहे. तर राजकुमार संतोषीचे दिग्दर्शन करणार आहेत. तिकिटबारीवर सरासरी यश मिळवलेल्या या चित्रपटाने लोकांना मनसोक्त हसवलं होतं. यामधील तेजा, क्राइम, मास्टर गोगो या व्यक्तिरेखा आजही लोकांच्या स्मरणात आहेत. दुसरीकडे अजय-रोहित ही जोडी प्रेक्षकांना हसवण्यासाठी गोलमालचा पुढील भाग घेऊन येत आहेत. यामध्येही तगडी स्टार कास्ट आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार करिना कपूरच्या जागेवर आलिया भट्ट या चित्रपटात असणार आहे. गोलमालच्या पहिल्या 3 भागांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं.

सलमान खान - अजय देवगण यांनी इश्क, हम दिल दे चुके सनम, सन ऑफ सरदार आणि लंडन ड्रीम्स, सर उठा के जिओ अशा चित्रपटामधून अभिनय केला आहे. दरम्यान, अजय देवगणचा बहुप्रतीक्षित 'शिवाय' हा चित्रपट दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होणार असून, त्याच वेळेस करण जोहर दिग्दर्शित ' ए दिल है मुश्किल' हाही चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.