Join us

सलमान खानने या कलाकाराला गिफ्ट केली BMW M5 कार, कारची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 16:14 IST

सलमान खानने या कारणामुळे आपल्या सहकलाकाराला महागडी कार गिफ्ट दिली आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा नुकताच दबंग ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.या चित्रपटातून पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाने सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली. या चित्रपटातून सई मांजरेकर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार किच्चा सुदीप याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. सुदीपचे काम सलमान खानला खूप आवडले आणि खूश होऊन त्याने त्याला महागडी भेटवस्तू दिली. अशी महागडी भेटवस्तू आपल्या सहकलाकारला देण्याची ही पहिली वेळ नाही. 

सलमान खान नुकताच साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीपच्या घरी गेला होता. यावेळी सलमानने त्याला नवीन बीएमडब्ल्यू एम 5 कार गिफ्ट केली होती.भेटवस्तू पाहून किच्चा खूपच खूश झाला होता. यावेळी सलमान आणि कारसोबतचे अनेक फोटो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जेव्हा आपण चांगलं करतो तेव्हा नेहमीच चांगलं होतं. सलमान खान सरांनी पुन्हा एकदा माझ्य़ावर विश्वास टाकला आहे आणि मला हे विशेष गिफ्ट दिलं आहे. तुम्ही माझ्यावर आणि माझ्या कुटूंबियांबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि आपण माझ्या घरी आलात याचा मला आनंद झाला.' या कारची किंमत जवळपास १.७ कोटी रुपये आहे.

यापूर्वी सलमानने सुदीपला एक खास जॅकेट गिफ्ट केलं होतं. या जॅकेटच्या मागील बाजूस सलमानच्या आवडत्या कुत्र्याचं चित्र आहे. किच्चाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्यात तो हे जॅकेट घालून दिसत आहे आणि सलमान या जॅकेटवर छापलेल्या कुत्र्याला किस करताना दिसला होता.

हे फोटो चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल झाले होते.

टॅग्स :सलमान खानदबंग 3