Join us

'डान्स +5'च्या मंचावर स्पर्धकांचे टॅलेंट पाहून भाईजानने स्वीकारले हे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:00 IST

सलमान खानने नुकतेच डान्स +5च्या मंचावर दबंग 3 चे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावली होती.

स्टार प्लसचा सर्वात लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो डान्स + 5 ने प्रतिभावान स्पर्धकांनी सादर केलेल्या अभूतपूर्व परफॉर्मन्सनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही स्पर्धा दिवसेंदिवस चॅलेंजिंग बनत चालली आहे. या आठवड्यात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याची सहकलाकार सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि दिग्दर्शक प्रभु देवा स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्या आगामी चित्रपट दबंग 3चे प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.

डान्स +5 वर नृत्य प्रतिभेच्या निखळ गुणवत्तेमुळे फक्त सलमान खानच नव्हे तर सोनाक्षी, सई आणि प्रभू देवा अगदी भारावून गेले. कारण गुणी प्रतिस्पर्धींनी त्यांच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सने फारच काही अविस्मरणीय क्षण साकारले. अशाच एका परफॉर्मन्सने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान अचंबित झाला. 

डान्स + 5 चा स्पर्धक जहांगीरच्या जग घुमेया या परफॉर्मन्सनंतर सलमान म्हणाला, “तुला डान्स करायला शाहरुख खान किंवा हृतिक रोशन यांची गाणी मिळाली नाहीत का? आणि दुसरीकडे, तू माझ्या गाण्यावर, माझ्यासमोर असा कमालीचा डान्स करून माझा अपमान केला आहेस असे मला वाटते आणि त्याचा बदला म्हणून पुढच्या वेळी जेव्हा मी डान्स + 5 च्या सेटला भेट देईन तेव्हा रेमो कडून प्रशिक्षण घेईन आणि परफॉर्म करेन. रेमो, उद्यापासून कोणतेही हार्डकोर प्रशिक्षण नाही. यापुढे वेटलिफ्टिंग आणि जिमिंग नाही. माझे लक्ष फक्त डान्स करण्याकडे असेल.”

असो, बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान डान्स करण्याचे कितपत मनावर घेतो हे पाहण्यासाठी थोडा धीर तर धारावंच लागेल, नाही का? सर्व धमाल, मस्ती, अद्भुत क्षण आणि थरारक परफॉर्मन्स पाहण्यासाठी या शनिवार-रविवार रात्री ८.०० वाजता फक्त स्टार प्लस वर डान्स +5 पहा. 

टॅग्स :सलमान खाननृत्यदबंग 3