Join us

सलमानच्या अभिनेत्रीची सँडल तुटली, भर रस्त्यात बसली; लोक म्हणाले...१०० रुपयांची चांगली असती टिकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:40 IST

महागडी चप्पल घेतात आणि एकदाच घालतात. व्हिडिओवर एकापेक्षा एक कमेंट्स

सलमान खानने (Salman Khan) बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना लॉंच केले आहे. त्यातील काही जणी एकाच चित्रपटानंतर गायब झाल्या तर काहींचे करिअर यशस्वी झाले. त्यातलीच एक डान्सर डेझी शाह (Daisy Shah) आठवते का? सलमानच्या 'जय हो' सिनेमातून तिने अभिनयात पदार्पण केले. डेझी आधी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होती. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भर रस्त्यातच चप्पल तुटली आणि...

एका व्हिडिओमध्ये डेझी शाह काळ्या रंगाच्या आऊटफिट मध्ये दिसत आहे. तिने काळ्या रंगाचीच हील्स घातली आहे. मात्र पायऱ्यांवरुन उतरताना नेमकी तिची हील्स तुटते. सगळे कॅमेरे तिच्याकडे फिरतात. मग काय ती सरळ पायरीवरच बसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हील्स घालणारी प्रत्येक मुलगी हे बघून असंच म्हणेल की 'अरे हे तर माझ्यासोबतही होतं.' डेझीच्या या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्सही येत आहेत. एका नेटकऱ्याच्या कमेंटने लक्ष वेधले आहे. 'तुमच्या लाख रुपयाच्या चपलेपेक्षा आमची १०० रुपयांची चप्पल चांगली आहे जी वर्षभर टिकते.' ही कमेंटही चांगलीच व्हायरल होत आहे. तर आणखी एकाने लिहिले, 'महागडी चप्पल घेतात आणि एकदाच घालतात. अशीच पडून पडून चप्पल खराब होते. नंतर जेव्हा घालतात तेव्हा असा इज्जतीचा फालुदा होतो. '

डेझी शाह ने 'जय हो' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ती फिल्ममध्ये येण्यापूर्वी कोरिओग्राफर गणेश आचार्यसह असिस्टंट म्हणून काम केले. तिने 'हेट स्टोरी ३', 'बॉडीगार्ड', 'रेस ३' आणि 'रामरत्न' यांसारख्या सिनेमात काम केले आहे.

टॅग्स :डेझी शहासलमान खानसोशल मीडियाट्रोल