सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर 'भारत'चे शूटिंग संपले, या महिन्यात होणार ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 03:29 PM2019-03-02T15:29:07+5:302019-03-02T15:35:35+5:30

सलमान खान आणि कॅटरिना कैफचा आगामी सिनेमा 'भारत'चा आतापर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओसमोर आले आहेत. सिनेमाशी संबंधित आणखी एक नवी माहिती आतासमोर येते आहे.

Salman khan and katrina kaif finished film bharat shooting in mumbai | सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर 'भारत'चे शूटिंग संपले, या महिन्यात होणार ट्रेलर आऊट

सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर 'भारत'चे शूटिंग संपले, या महिन्यात होणार ट्रेलर आऊट

googlenewsNext
ठळक मुद्देशेवटच्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईत करण्यात आलेईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सलमान खान आणि कॅटरिना कैफचा आगामी सिनेमा 'भारत'चा आतापर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओसमोर आले आहेत. सिनेमाशी संबंधित आणखी एक नवी माहिती आतासमोर येते आहे. भारतची शूटिंग नुकतीच संपली आहे. 


मिड-डेच्या रिपोर्ट नुसार, सलमान-कॅटरिनाच्या भारत सिनेमाची शूटिंग एक इमोशनल सीन शूट करुन संपली आहे.  सिनेमाची शूटिंग लुधियाना, माल्टा, दिल्ली आणि अबू धाबीमधले सुंदर लोकेशन्सवर करण्यात आली आहे. शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईत करण्यात आले. हा इमोशन सीन कॅटरिना आणि सलमानवर शूट करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 


ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. 'भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. 

Web Title: Salman khan and katrina kaif finished film bharat shooting in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.