सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान हनुमानाचा भक्त बनला होता. जो ना खोटे बोलतो, ना कुणाचे वाईट चिंततो; पण आता एक नवी बातमी आहे. होय, हनुमानाचा भक्त बनल्यानंतर आता सलमान स्वत: हनुमानाची भूमिका साकारणार आहे. आश्चर्यचकित झालात? दिग्दर्शक सुुधीर मिश्रा हे वीर हनुमानावर एक अॅनिमेशन चित्रपट बनवत आहेत. ‘हनुमान द दमदार‘ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील हनुमानाच्या अॅनिमेटेड पात्राला सलमानने स्वत:चा आवाज दिला आहे. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटात सलमान ‘मैं हूँ हनुमान तेरा’ असे गुणगुणतानाही दिसेल. होय, हे अगदी खरे आहे. या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. निश्चितपणे सलमानच्या चाहत्यांसाठी हे मोठे सरप्राईज आहे. सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो कॅटरिना कैफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल. लवकरच सलमानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.
सलमान खान बनणार ‘बजरंगी’!!
By admin | Published: April 14, 2017 4:07 AM