Join us

सलमानची बहिण अर्पिता खानपासून घटस्फोट घेणार आयुष शर्मा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 15:10 IST

अर्पिता खान आणि आयुष शर्मा हे 2014 मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानची अर्पिता खान आणि पती आयुष शर्मा हे 2014 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. यंदा त्यांच्या लग्नाला एक दशक पूर्ण होईल. आपल्या १० वर्षांच्या संसारात आयुष आणि अर्पिता यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अनेकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या आहेत.  नुकतेच आयुष शर्माने एका मुलाखतीत अर्पिताला घटस्फोट देण्यावर भाष्य केलं. 

नुकतेच आयुषनं 'न्यूज १८' ला मुलाखत दिली. यावेळी  त्याने एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला, 'मला एक छोटा प्रसंग आठवतो. मी माझ्या मुलाला डोसा खाऊ घालण्यासाठी बाहेर पडलो होतो. तेव्हा मला पापाराझींनी अडवलं आणि विचारलं की अर्पिता आणि मी घटस्फोटासाठी अर्ज करत आहोत का? त्याचा हा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं. मग मी घरी येताच तु मला घटस्फोट देत आहेस का असं अर्पितला विचारलं. यावर मग आम्ही दोघेही हसलो'. यासोबत अर्पिता ही त्याचा आधारस्तंभ असल्याचं त्यानं सांगितलं. 

आयुष आणि अर्पिताच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर  २०११ मध्ये एका पार्टीत दोघांची भेट झाली होती.  आयुषने सुरुवातीला अर्पितासमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या, तर अर्पिताने त्याला उत्तर देण्याआधी वेळ घेतला होता. काही वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर दोघांनी २०१४ साली लग्न केलं. या जोडप्याला मुलगा अहिल आणि मुलगी आयत अशी दोन अपत्ये आहेत. 

आयुष सध्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहेत.  इंडस्ट्रीत पदार्पण करुन त्याला आता ६ वर्ष झाली आहेत. या ६ वर्षात त्याने तीन सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. लवयात्री, अंतिम सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर नुकतेच त्याचा 'रुस्लान' हा सिनेमा २६ एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण भुतानी यांनी केलं आहे. 

टॅग्स :आयुष शर्मासेलिब्रिटीबॉलिवूडअर्पिता खानसलमान खान