Join us

सलमान खानने साजरा केला गर्लफ्रेंड यूलिया वंतूरचा वाढदिवस; दोघांंच्या वयात किती अंतर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:41 IST

गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी भाईजानची पार्टी, नक्की कोण आहे यूलिया वंतूर?

सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरने (Iulia Vantur)  काल ४४ वा वाढदिवस साजरा केला. यूलिया मॉडेल, गायिका आणि अभिनेत्रीही आहे. काल तिच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीत भाईजान सलमान खानही हजर होता. इतकंच नाही तर संपूर्ण खान कुटुंब यावेळी तिथे होतं. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. सलमानचे भावोजी दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीने हा फोटो शेअर केला आहे.

यूलिया वंतूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. अतुल अग्निहोत्रीची स्टोरी तिने रिपोस्ट केली आहे. यामध्ये सलमान खानसह अर्पिता, अलविरा, शेरा, आयुष शर्मा, सोहेल खानचा मुलगाही दिसत आहे. तसंच इतर मित्रपरिवार आहे.  तर बर्थडे गर्ल यूलिया मध्यभागी बसली आहे. यूलियाचं सलमानच्या कुटुंबासोबत छान नातं आहे. या फोटोसोबत तिने आय लव्ह यू म्हणत हार्ट इमोजीही शेअर केला आहे. 

यूलिया वंतूरने बॉलिवूड सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. 'जीनिअस', 'प्यार दे प्यार ले', 'राधे' मधलं 'सीटी मार' सारखी काही गाणी तिने गायली आहेत. यूलिया सलमान खानसोबत बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप दोघांनी त्यांचं नातं जाहीर केलेलं नाही. यूलियाने सलमानच्या 'दबंग 3' मध्ये गाणं गायलं होतं. २०११ मध्ये 'एक था टायगर' सिनेमाच्या वेळी डब्लिनमध्ये तिची सलमानशी ओळख झाली होती. 

यूलिया वंतूर मूळची रोमानियाची आहे. तिने तेथील लोकप्रिय शो 'डान्सिंग विद द स्टार्स'चं होस्टिंग केलं आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. सलमान आणि यूलियामध्ये १५ वर्षांचं अंतर आहे. 

टॅग्स :सलमान खानयुलिया वंतूरबॉलिवूडरिलेशनशिपसोशल मीडिया