KRKने घेतला ‘राधे’शी पंगा, भाईजानने ठोकला मानहानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:06 AM2021-05-26T11:06:52+5:302021-05-26T11:07:21+5:30
केआरकेने ‘राधे’वर अशी काही टीका केली की भाईजान भडकला आणि त्याने केआरकेविरोधात मानहानीचा दावा ठोकला.
भाईजान सलमान खानशी (Salman Khan ) पंगा घेणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. होय, हा अभिनेता कोण तर केआरके अर्थात कमाल आर खान. ( kamaal r khan ) केआरकेने ‘राधे’वर अशी काही टीका केली की भाईजान भडकला आणि त्याने केआरकेविरोधात मानहानीचा दावा ठोकला. या कारवाईनंतर केआरकेने अनेक ट्विट केले आहेत. जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत. (Salman Khan files defamation case against KRK )
मुंबईच्या एका कोर्टात केआरकेविरोधात दावा दाखल केला आहे. लवकरात लवकर यावर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केआरकेवर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाची प्रतीमा मलीन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
#Radhe film’s first half review live from #Vox cinema #Dubai! Watch and RT for others also pls! https://t.co/gm6m0UAlAT via @YouTube
— KRK (@kamaalrkhan) May 13, 2021
केआरकेने त्याच्या ट्विटर व युट्यूब हँडलवर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चा रिव्ह्यू दिला होता. राधेचा पहिला पार्ट पाहून माझ्या मेंदूचा पार भुगा झाला. दुसरा पार्ट पाहण्याची माझी हिंमत होत नाहीये. दुसरा पार्ट पाहिला तर मला वेड लागेल, असे म्हणत केआरके रिव्ह्यू व्हिडीओमध्ये चक्क रडला होता.
केआरकेचे ट्विट
Dear #Salmankhan Ye defamation case Aapki Hataasha Aur Niraasha Ka Saboot Hai. I am giving review for my followers and doing my job. You should make better films instead of stopping me from reviewing your films. Main Sacchi Ke Liye Ladta Rahunga! Thank you for the case. 🙏🌹 pic.twitter.com/iwYis64rLd
— KRK (@kamaalrkhan) May 25, 2021
सलमानच्या या कारवाईनंतर केआरकेने अनेक ट्विट केलेत. ‘प्रिय सलमान, हा मानहानीचा दावा तुझ्या नैराश्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोअर्ससाठी रिव्ह्यू देतोय आणि माझे काम करतो. मला रिव्ह्यू देण्यापासून रोखण्याऐवजी तुला चांगले सिनेमे बनवायला हवे. मी सत्यासाठी ही लढाई नक्की लढेन. केससाठी धन्यवाद,’ असे पहिले ट्विट केआरकेने केले आहे.
I said so many times that I never review film of any producer, actor if he asks me to not review. Salman khan filed defamation case on me for review of #Radhe means he is getting too much affected by my review. Hence I won’t review his films anymore. My last video releasing today
— KRK (@kamaalrkhan) May 26, 2021
दुस-या ट्विटमध्ये त्याने लिहिले, ‘ सलमान खानने मी राधेचा रिव्ह्यू केल्यामुळे माझ्यावर मानहानीचा दावा ठोकला. याचा अर्थ स्पष्ट आहे, माझ्या रिव्ह्यूमुळे तो दुखावला आहे. यामुळे मी आता त्याच्या कोणत्याही सिनेमाचा रिव्ह्यू करणार नाही.’