Join us

Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या

By मनीषा म्हात्रे | Published: May 01, 2024 3:03 PM

गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या आरोपींना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. यात बिश्नोई गँगच्या अनुज कुमार थापन याने पोलीस लॉक अपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. थापन याला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलला नेण्यात आले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

थापन याच्यासह दोघांना २५ एप्रिलला अटक करण्यात आली होती. सलमान खानवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना या दोघांनी ४० काडतुसे पुरवली होती. 

थापन हा बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. तो मुळचा पंजाबचा आहे. क्लिनर म्हणून काम करत होता. १५ मार्च रोजी दोन बंदूक, चार मॅगझीन आणि ४० काडतुसे हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपीना पुरवली होती. त्यापैकी १७ काडतुसे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. उर्वरित १६ काडतुसांचे गूढ कायम असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

चंदर आणि थापन दोघेही मोबाईल फोन द्वारे हल्लेखोरांच्या संपर्कात होते. त्यांना फ्लाईटने मुंबईत आणण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली होती. 

टॅग्स :सलमान खानमुंबई पोलीस