ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 18 - बॉलिवूडचा मोस्ट वॉण्टेड एलिजिबल म्हणून ओळखल्या जाणा-या सलमान खानच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गेले काही दिवस सलमान खान गर्लफ्रेंड लुलियासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. मात्रा यावर अधिकृतपणे सलमान खान किंवा त्याच्या कुटुंबियांनी जाहीरपणे भाष्य करणं टाळलं होतं. मात्र अभिनेत्री प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला लुलियासोबत जाहीर हजेरी लावून सलमानने सर्व चर्चांना पूर्णविराम देत 'हम साथ साथ है' असल्याचे स्पष्ट केले होते.
स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार यावर्षीच्या अखेरपर्यंत सलमान खान विवाहबंधनात अडकणार आहे. सलमान खानच्या कुटुंबियांनी लग्नाची तारीख नक्की केली आहे. सलमान खानच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार 27 डिसेंबरला सलमान खान लुलियासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे 27 डिसेंबरला सलमान खानचा 51वा वाढदिवस असून लग्नासाठी हाच दिवस ठरवण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवस आणि लग्न असा दुहेरी योग जुळून येणार आहे.