Join us

ना ऐश्वर्या ना कतरिना, सलमानने 'या' अभिनेत्रीसाठी तोडलेली 'नो किसींग पॉलिसी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 8:48 AM

कोण आहे ती अभिनेत्री आणि कोणता होता तो सिनेमा?

सलमान खानने (Salman Khan) 'मैने प्यार किया' रोमँटिक लव्हस्टोरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर त्याने 'साजन','हम आपके है कौन' सारख्या काही प्रेमकहाण्यांमध्येही काम केलं. सलमानने कधीच ऑनस्क्रीन किसींग सीन दिला नाही असाच अनेकांचा समज आहे. कारण त्याने सुरुवातीपासूनच 'नो किसींग पॉलिसी' फॉलो केली. पण अशी एक अभिनेत्री आहे जिच्यासोबत सलमानने या पॉलिसीचं उल्लंघन करत किसींग सीन दिला होता. कोण आहे ती अभिनेत्री आणि कोणता होता तो सिनेमा?

Reddit वर सध्या एक फोटो व्हायरल होतोय. सलमानच्या जुन्या लूकमधला हा फोटो आहे. म्हणजेच त्याच्या ९० दशकातील सिनेमाचा हा फोटो आहे. यामध्ये सलमान एका अभिनेत्रीला kiss करताना दिसतोय. हा सिनेमा आहे 'जीत' आणि ही अभिनेत्री कपूर घराण्याची मोठी मुलगी करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आहे. त्यांच्या किसींग सीनचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहे. सलमान आणि करिश्माने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यापैकी  'जीत'मध्ये त्याने हा किसींग सीन दिला होता.

Surprised to know Salman had done a small lip lock with karishma kapoor in jeet because he is known for no kissing policy byu/Sea-Fix691 inBollyBlindsNGossip

या फोटोवर अनेकांनी कमेंट करत वेगळं मत दिलं आहे. ते खरोखर किस करत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर काहींनी 'हे खरं आहे का?' असं विचारत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कतरिनासाठीही नाही तोडली पॉलिसी

2017 मध्ये 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगवेळी दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमानला ऑनस्क्रीन किस करण्यास सांगितले होते. पण तेव्हाही सलमानने स्पष्ट नकार दिला होता. तेव्हा दिग्दर्शकाने त्याचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण सलमान आपल्या पॉलिसीवर ठाम राहिला होता.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमाकरिश्मा कपूर