ठळक मुद्दे मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये भारतचा सेट उभारण्यात आला आहे. लमानसाठी 10 हजार स्कवेअर फिटची जिमदेखील उभारण्यात आली आहे
सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. भारतचा टीझर आधीच प्रेक्षकांना आवडला आहे.
सध्या मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये भारतचा सेट उभारण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेटवर सलमानसाठी 10 हजार स्कवेअर फिटची जिमदेखील उभारण्यात आली आहे. रिपोर्टनुसार सलमान खान याच जिममध्ये राहत असल्याचे कळतेय. सलमानला वांद्रे ते गोरेगाव हा रोजचा प्रवास करायचा नाही. त्यामुळे ही जिम बांधण्यात आल्याची माहिती आहे. फिल्मसिटीमध्ये सलमान सध्या भारतच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग करतो आहे. सलमानला या सिनेमाचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे.
‘भारत’ हा चित्रपट कोरियन सिनेमाचा हिंदी रिमेक आहे़ यात सलमान २० ते ६० वयाच्या व्यक्तिंच्या व्यक्तिरेखा साकारणार आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसतील. यातला एक लूक मॉडर्न असेल. याकाळात सिनेमात त्याचे आणि कॅटरिना प्रेम होईल आणि नंतर लग्न.