'बालिका वधू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आनंदी म्हणजेच अविका गोर (Avika Gor) हिने आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विक्रम भट यांच्या '1920:हॉरर ऑफ द हार्ट' सिनेमातून डेब्यू करत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती अनेक मुलाखती देत आहे. याआधी तिला बॉलिवूडच्या 2 सिनेमातून रिप्लेस केल्याचा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट सलमान खानचे (Salman Khan) होते.
अविका गोरने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ''सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मध्ये मला संधी मिळाली होती. पेपरवर्कही झाले होते फक्त साईन राहिली होती. मात्र मला ऐनवेळी रिप्लेस केले गेले. त्याचं कारणही मला सांगण्यात आलं नाही. पण मला वाटलंच होतं असं होईल कारण याआधी सलमान खानच्याच 'अंतिम:द फायनल ट्रुथ' मधूनही मला ऐनवेळी रिप्लेस केले गेले होते.''
ती पुढे म्हणाली, 'सलमानच्या टीमने 'अंतिम' सिनेमाची ऑफर मला दिली होती. कास्ट होण्यापूर्वी दोन आठवडे आधीच मला सांगण्यात आलं की दुसऱ्या कोणालातरी साईन करण्यात आलं आहे. पण मला याचं काहीच वाटत नाही. असं होतंच राहतं. शेवटी त्यांची मर्जी आहे. त्यांची काही कारणं असतील जी त्यांनाच माहित असतील.'
जेव्हा अविका झाली होती दु:खी : मी सुद्धा माणूस आहे
अविका म्हणाली, 'शेवटी मी पण एक माणूस आहे. कधी कधी वाटतं काश! असं दुसऱ्या वेळी घडलं नसतं. पण मला वाटतं ते होणारच होतं. मी हे नाही म्हणत की ते चुकीचे आहेत. शेवटी त्यांना सुद्धा योग्य प्रकारे कास्ट करायचं असतं. त्यांना निर्णय घ्यायचा असतो की या भूमिकेसाठी कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य.'