बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार म्हणजे सलमान खान. सलमानला (salman khan) आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सलमानचा सिकंदर सिनेमा नुकताच रिलीज होणार आहे. उद्या ३० मार्चला ईदच्या मुहुर्तावर 'सिकंदर' (sikandar movie) सिनेमा जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अशातच सलमानने एका मुलाखतीत चक्क हात जोडलेत. याशिवाय मनातील भावना व्यक्त केलीय. काय म्हणाला सलमान, जाणून घ्या
सलमान हात जोडत काय म्हणाला
ANI या न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने सिनेमांशी संबंधित जे वादविवाद घडतात त्या विषयावर हात जोडलेत. सलमान म्हणाला की, "आता नको. मला आता कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी नकोय. याआधी अनेक वाद-विवाद अनुभवले आहेत. एखाद्या सिनेमासंबंधी वाद निर्माण झाला तर तो सिनेमा हिट होतो, असं मला वाटत नाही. अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीमुळे सिनेमाचं फ्रायडे रिलीज पुढे ढकलण्यात आलं आहे."
सलमान खान पुढे म्हणाला, "याआधी खूप वादविवाद पाहिले आहेत. आता आमच्या कुटुंबाला कोणत्याही वादात न अडकता शांतपणे आयुष्य जगायचं आहे. जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की, सिनेमासमोर ट्रेलर काहीच नाही. अशा अनेक गोष्टी असतात ज्या ट्रेलरमध्ये टाकू शकत नाही. सिनेमा तुम्हा सर्वांना नक्की आवडेल, यात शंका नाही." सिकंदर सिनेमा ३० मार्चला रिलीज होणार आहे.