सलमान खान (Salman Khan) व शाहरूख खान ( Shahrukh Khan) ही प्रेक्षकांची आवडती जोडी. तुम्हीही या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, 'टायगर वर्सेस पठाण'ची (Tiger Vs Pathan) जोरदार चर्चा आहे. 'पठाण'च्या अभूतपूर्व यशानंतर यशराज फिल्म्सला आता सलमान आणि शाहरुखला पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र आणायचं आहे आणि त्याची तयारी सुरू झाली आहे. यावेळी शाहरूख व सलमानचा कॅमिओ नसून दोघंही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या सिनेमासाठी यशराजने मोठा बजेट सेट केल्याचीही चर्चा आहे.
यावर्षी २५ डिसेंबरला शाहरूखचा पठाण हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने बाॅक्स ऑफिसवर धमाका केला. पठाण जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सनी 'टाइगर वर्सेज पठान' (Tiger Vs Pathaan) या सिनेमाची तयारी सुरू केल्याचं कळतंय. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण रिपोर्टनुसार, आदित्य चोप्रा या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. ३०० कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार होणार आहे. विशेष म्हणजे यात कलाकारांच्या मानधनाचा समावेश नाहीये.
कोण असेल हिरोईन...?सलमान व शाहरूख यांचं नाव तर फायनल आहे. पण सिनेमात हिरोईन कोण असणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. एक था टायगर या सिनेमात सलमानच्या अपोझिट कतरिना कैफ होती. तर पठाण मध्ये दीपिका पादुकोण. चर्चा खरी मानाल तर या दोघींपैकी एक या सिनेमाची हिरोईन् असू शकते. काही रिपोर्टनुसार, सिनेमा दोघीही दिसू शकतात. तूर्तास शाहरूख व सलमानचं नाव फायनल आहे. सिद्धार्थ आनंद हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. आदित्य चोप्रांचा सिद्धार्थ आनंदच्या कामावर प्रचंड विश्वास आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे.
शाहरुख आणि सलमान पहिल्यांदा 1995 मध्ये आलेल्या 'करण अर्जुन' या चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट तुफान खूप गाजला होता. त्यानंतर दोघांनी 'हम तुम्हारे हैं सनम'मध्ये एकत्र काम केलं. 'कुछ कुछ होता है'मध्ये सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर शाहरुख खानच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो'मध्येही सलमानचा कॅमिओ होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' या चित्रपटात सलमानचा दमदार कॅमिओ पाहायला मिळाला. आता या जोडीला पुन्हा एकत्र आणण्यासाठी यशराजने कंबर कसली आहे. त्यात त्यांना किती यश मिळतं ते बघूच.