Join us

'सिकंदर'शो सुरु असताना थिएटरमध्येच फोडले फटाके, जीव वाचवण्यासाठी प्रेक्षकांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:59 IST

सलमानच्या चाहत्यांनी ओलांडली सीमा, कुठे घडला हा प्रकार?

सलमान खानचा (Salman Khan)  'सिकंदर' (Sikandar) सिनेमा ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला आहे. ईदला आलेला भाईजानचा सिनेमा सुपरहिट होणार यात शंका नसते. तसंच भाईजानचे चाहते काही कमी नाहीत. सलमानच्या एन्ट्रीवर थिएटरमध्ये जोरदार शिट्ट्यांचा आवाज असतो. मात्र अनेकवेळा काही गैरप्रकारही घडतात. एका थिएटरमध्ये चाहत्यांनी चक्क फटाके फोडले. यामुळे प्रेक्षकांना तिथून पळ काढावा लागला. कुठे घडलाय हा प्रकार?

सलमान खानचा सिनेमा म्हटलं की अनेकदा चाहते थिएटरमध्ये मर्यादा ओलांडत काही ना काही अनुचित प्रकार घडतात. नुकत्याच रिलीज झालेल्या 'सिकंदर' सिनेमावेळी असाच काहीसा प्रकार घडला आहे. महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील थिएटरमध्ये 'सिकंदर'चा शो सुरु होता. तेव्हा सलमान खानच्या एन्ट्रीला चाहते जोरजोरात ओरडतात आणि चक्क फटाके फोडतात. यामुळे काही प्रेक्षक चक्क जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतात. स्क्रीनवर सिनेमातील 'जोहरा जबीं' गाणं वाजताना दिसत आहे. यामध्ये सलमान आणि रश्मिकाचा डान्स पाहायला मिळतोय जे चाहते शिट्ट्या वाजवत एन्जॉय करत आहेत. मात्र अचानक फटाके वाजल्याने अनेकांची धांदल उडालेलीही पाहायला मिळत आहे.

मालेगाव हे मुस्लिम बहुल शहर आहे. त्यामुळे तिथे ईदच्या मुहुर्तावर सलमानचा सिनेमा येणं ही मोठी गोष्ट आहे. मोठ्या संख्येने चाहते थिएटरमध्ये हजेरी लावतात. मात्र अशा अनुचित प्रकारांमुळे जीवितहानीही होण्याचा धोका असतो. एकंदरच हे दृश्य भयानक आहे आणि यामुळे प्रेक्षकांचा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

याआधीही सलमानच्या 'टायगर ३' वेळी थिएटरमध्ये फटाके फोडण्यात आले होते. तेव्हा सलमानने कोणाचाही जीव धोक्यात न घालता सिनेमा एन्जॉय करा असं चाहत्यांना आवाहन केलं होतं.

टॅग्स :सलमान खानमालेगांवनाटकफटाकेसोशल मीडिया