Join us  

Bigg Boss 12: सलमान खान नाही तर या सुपरस्टारला मिळाली होती बिग बॉस होस्ट करण्याची ऑफर, या कारणामुळे दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:38 PM

छोट्या पडद्यावरचा सगळ्यात विवादित शो बिग बॉसचा 12 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी सलमानने बिग बॉसचे गोव्यामध्ये लॉचिंग केले.

ठळक मुद्दे 16 सप्टेंबरपासून बिग बॉसचे नवे सीझन प्रसारित होणार आहेगोव्यामध्ये शो लॉचिंगच्या दरम्यान सलमानने अनेक इंटरेस्टिंग खुलासे केले

छोट्या पडद्यावरचा सगळ्यात विवादित शो बिग बॉस 12 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी सलमानने बिग बॉसचे गोव्यामध्ये लॉचिंग केले. 16 सप्टेंबरपासून बिग बॉसचे नवे सीझन प्रसारित होणार आहे. बिग बॉसचे गेले 9 सीझन सलमान खानने होस्ट केले आहेत. गोव्यामध्ये शो लॉचिंगच्या दरम्यान सलमानने अनेक इंटरेस्टिंग खुलासे केले.      

यापैकी एक होता सलमानच्या आधी याशोसाठी शाहरुख खानला अप्रोच करण्यात आले होते. बिग बॉस होस्ट करण्यासाठी तो पहिला पसंद नव्हता. शोच्या मेकर्सनी त्याच्या आधा शाहरुखला संपर्क केला होता मात्र त्यावेळी शाहरुखच्या खांद्याला दुखापत झाली असल्याने नकार दिला यानंतर ही संधी सलमान खानला मिळाली. त्यामुळे सलमानने शाहरुखचे आभार मानले.    

बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.   या सीझनच्या बारा जोडींपैकी पहिली जोडी आहे कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया. सलमानने त्यांच्या नावाची घोषणा या कार्यक्रमात केली. पहिल्यांदाच सलमान खान स्पर्धकांची नावे जाहीर करत आहे. भारती सिंग व हर्ष लिंबाचिया ३ डिसेंबर, २०१७ रोजी गोव्यामध्ये विवाहबंधनात अडकले होते. कलर्स वाहिनीवरील खतरों के खिलाडी या रिएलिटी शोच्या नवव्या सीझनमध्ये भारती व हर्ष स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते आणि आता हे दोघे कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या शोमध्ये सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :बिग बॉस 12सलमान खान