Join us

Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 3:25 PM

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या नावाने सातत्याने धमक्या येत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या नावाने सातत्याने धमक्या येत आहेत. पुन्हा एकदा ट्रॅफिक पोलिसांना सलमानच्या नावाने धमकी मिळाली होती. यानंतर खळबळ उडाली. मात्र तातडीने कारवाई करत पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

सलमान खानच्या नावाने ट्रॅफिक पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो कर्नाटकचा आहे. विक्रम असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय अंदाजे ३५ वर्षे आहे. कर्नाटक पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं. त्यानंतर आता मुंबई पोलिसांचं पथक उद्या विक्रमला घेऊन मुंबईत येणार आहे. विक्रमने धमकी का दिली आणि त्याचा कोणत्याही टोळीशी संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देण्यात आली होती, ज्यामध्ये ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा मेसेज आला आहे. 

पोलिसांनी पुढे सांगितले की, पाठवलेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी रुपये द्यावेत. त्याने तसं केलं नाही तर आम्ही त्याला ठार मारू, आमची गँग अजूनही सक्रिय आहे असं धमकीमध्ये म्हटलं आहे. 

ऑक्टोबरमध्येही सलमानला अशीच धमकी मिळाली होती, ज्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी जमशेदपूरमधील २४ वर्षीय तरुणाला अटक केली होती. धमकी देणारी व्यक्ती भाजीवाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सततच्या धमक्यांना न घाबरता सलमान आपलं काम करत आहे. तो हैदराबादमध्ये त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. 

टॅग्स :सलमान खानगुन्हेगारीमुंबई पोलीस