बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)ची फिल्मी कारकीर्द केवळ रंजक कथांनी भरलेली नाही तर त्याचे वैयक्तिक आयुष्यही कमी फिल्मी नाही. सलमान खानचे अनेक अफेअर्स बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र सलमान आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या प्रेमकथेचा सर्वाधिक उल्लेख करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या सुपरहिट चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील जवळीक वाढली होती आणि या चित्रपटाच्या सेटवर सलमानने संजय लीला भन्साळींवर संतापला होता.
खरेतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप खूप वाईट वळणावर झाले होते. दोघेही एकमेकांबद्दल नेहमीच मौन बाळगतात पण ऐश्वर्याने एकदा सलमानला पझेसिव्ह बॉयफ्रेंड म्हटले होते. तसेच, ऐश्वर्यावरून सलमान खानचा गोंधळ आणि विवेक ओबेरॉयला धमकावल्याचा आरोप या प्रकरणाचीही खूप चर्चा झाली होती. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये खूप छान बॉन्ड दिसून आला. याबाबत चित्रपटात ऐश्वर्याच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग शेअर केला होता. स्मिता यांनी सांगितले की, चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान गोष्टी गंभीर झाल्या होत्या.
भन्साळींवर संतापला होता सलमान
चित्रपटातील सुपरहिट गाण्याच्या 'आँखों की गुस्ताखियां माफ हो'च्या शूटिंगदरम्यान संजय लीला भन्साळी ऐश्वर्या रायला डान्स मूव्ह्स समजावून सांगत होते. यादरम्यान संजय यांनी ऐश्वर्याचा हात धरला तेव्हा तिथे उभा असलेला सलमान अचानक संतापला. जेव्हा संजय यांनी ऐश्वर्याच्या हाताला स्पर्श केला तेव्हा सलमान त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, संजय सर, तुम्ही तिला स्पर्श का केला... तुम्ही तिला अजिबात स्पर्श करू शकत नाही. सलमानने असे केल्यामुळे सेटवरील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पण हा मोठा मुद्दा बनला नाही.
वर्कफ्रंट
सलमानने ऐश्वर्याला जास्त प्रोटेक्शन दिल्याने इतरांना त्रास झाला. मात्र, नंतर संजय लीला भन्साळी आणि सलमानचे नाते सामान्य झाले. काही काळापूर्वी जेव्हा भन्साळींची हीरामंडी ही वेब सिरीज रिलीज झाली तेव्हा सलमान खाननेही प्रीमियरला हजेरी लावली होती. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सलमान खान 'सिकंदर'मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.