Join us

सलमान खाननं 'बच्चा पार्टी'ची इच्छा केली पुर्ण, 'भाईजान'च्या दयाळूपणाचे होतेय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:07 IST

सलमान खानचा एक व्हिडीओ त्याचा खास मित्र साजन सिंगने आता शेअर केला आहे.

Salman Khan:  अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला बॉलिवूडचा भाईजान म्हटलं जातं. सलमान नेहमीच आपल्या उदार व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो. सलमान नेहमीच त्याच्या मित्रांना मदत करण्यासाठी पुढे असतो. अनेक सामाजिक कार्येदेखील तो करत असतो. तो नेहमीच सर्वांना भेटवस्तू देत असतो. आताही सलमानच्या एका कृतीचं कौतुक होत आहे. सलमानने लहान मुलांसाठी एक खास गोष्ट केली. 

सलमान खानचा एक जुना व्हिडीओ त्याचा खास मित्र साजन सिंगने आता शेअर केला आहे. ज्यामध्ये तो काही मुलांसोबत एका स्पोर्ट्स शॉपमध्ये दिसतोय. या व्हिडीओमध्ये तो मुलांना त्यांच्या आवडी-निवडींबद्दल विचारताना दिसत आहे. यावेळी सलमान एका मुलाला नवीन सायकल भेट देतो. नवीन सायकल मिळातच तो छोटा चाहता आनंदी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. सलमानच्या दयाळूपणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सलमान खान मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा जेव्हा सलमान मुलांसोबत असतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो. आपल्या भाचीवर तर त्याचं प्रचंड प्रेम आहे. सलमान खानच्या दयाळुवृत्तीचे अनेक किस्से आहेत. फिल्म इंडस्ट्रीतही त्यानं अनेकांना मदत केली आहे. अलिकडेच, मराठी अभिनेता महेश मांजरेकर यांनीही खुलासा केला की जेव्हा ते कठीण काळातून जात होते, तेव्हा सलमान खान त्याच्या पाठीशी उभा होता. याशिवाय सुनील शेट्टी, संजय दत्त, गोविंदा आणि बॉबी देओल सारख्या स्टार्सनी सलमानचे अनेक वेळा कौतुक केले आहे. 

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकताच त्याचा 'सिंकदर' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.  सिकंदरमध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना झळकली होती. सलमान आता आगामी 'टायगर व्हर्सेस पठाण', 'किक २', आणि संजय दत्तासोबत पुढील सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खानसोशल मीडियासेलिब्रिटीबॉलिवूड