सलमान खान आणि वाद यांचे जुने नाते आहे. त्याची प्रसिद्धी वाढतेय तसेच त्याचे वादही वाढताहेत. कधी संताप तर कधी सवय यामुळे सलमानने कायम वाद ओढवून घेतले. ‘सुल्तान’ या चित्रपटात एका पहेलवानाची भूमिका साकारण्याच्या अनुभवाची तुलना त्याने थेट बलात्कारपीडित महिलेशी करून टाकल्याने त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. सलमान आणि वाद जणू समीकरणच झाले आहे. एक नजर टाकू या त्याच्या इतर वादांवर....
< १९९२ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपुरात एका काळवीटाच्या शिकारीसोबतच सलमान वादात सापडला आणि पुढे हे वाद वाढतच गेलेत. काळवीट शिकार प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
< सन २००२ मध्ये सलमान ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात फसला. सलमानच्या कारने फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले. यापैकी एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा खटला न्यायालयात पोहोचल्यावर ‘तो मी नव्हेच’ असे सलमान म्हणाला. गाडी मी नाही तर माझा ड्रायव्हर चालवत होता, असा दावा त्याने केला. अखेर न्यायालयाने सलमानची निर्दोष सुटका केली.
< सन २००२ याच वर्षात ऐश्वर्या राय हिला कथितरीत्या मारहाण केल्यावरून सलमान वादात सापडला. त्यावेळी सलमान व ऐश्वर्या प्रेमात होते. मात्र मारहानीनंतर ऐश्वर्या त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.
< सन २००८ मध्ये सलमान किंगखान शाहरुखसोबत भांडून चर्चेत आला. एक्स गर्लफे्र न्ड कॅटरिना कैफ हिच्या बर्थ डे पार्टीत सलमान-शाहरुख यांचे वाजले होते. हे कोल्ड वॉर आता आतापर्यंत सुरू होते. मात्र सलमानची बहीण अर्पिता हिच्या लग्नात शाहरुख व सलमानच्या नात्यातील तणाव काहीसा निवळला.
< सन २०१० मध्ये पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे सलमान चर्चेत आला. त्याला २६/११ बाबत प्रश्न विचारला होता. यावर सोसायटीच्या एलीट ग्रुपला टार्गेट केले गेल्यामुळे हा हल्ला झाला, असे उत्तर सलमानने दिले होते.