Join us  

या कारणामुळे सलमान-रणबीरची होणार टक्कर

By admin | Published: January 13, 2017 6:49 PM

दबंग सलमान खान आणि बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर यांच्या नात्यात कतरिनामुळे दुरावा आला होता. आता हे दोघेही सुपरस्टार पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - दबंग सलमान खान आणि बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर यांच्या नात्यात कतरिनामुळे दुरावा आला होता. आता हे दोघेही सुपरस्टार पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. बॉक्स ऑफिसवर दोघांचे चित्रपटएकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. सलमान खानचा टाईगर जिंदा है आणि रणबीरचा संजय दत्तच्या आयुष्यावर बनत असलेल्या बायोपिक एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. Deccan Chronicle च्या वृत्तानुसार सलमान-कतरिनाचा टाईगर जिंदा है आणि रणबीरचा चित्रपट ख्रिसमसला तिकिटखडकीवर झळकणार आहेत. 
 
सलमान खानचा चित्रपट म्हटलं की कोणताचं कलाकर आपला चित्रपट त्याच्यासमोर प्रदर्शित करत नाहीत, शाहरुख, आमिर खान, अजयसारखे दिग्गजांनीही कधी धाडस कोणताच कलाकर दाडस दाखवतं नाही. पण निर्माते -दिग्दर्शक राजकुमार हिराणीने ख्रिसमसला चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस दाखवलं आहे. 
 
एक था टाईगरचा सिक्वल असलेला टाईगर जिंदा है यशराज बॅनर खाली तयार होतं आहे. यामध्ये सलमान-कतरिना मुख्य भुमिकेत आहेत. तर संजय दत्तच्या बायोपिक मध्ये रणबीर-सोनम कपूर मुख्य भुमिकेत आहेत. 
 
सलमान खान सध्या कबिर खानच्या ट्युबलाईटच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. ईद 2017 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर रणबीर जग्गा जासूसच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.