Join us

सलमान म्हणतो माझी परिस्थिती बलात्कार पिडीत महिलेसारखी, सोशल मिडियावर संताप

By admin | Published: June 21, 2016 8:47 AM

आगामी चित्रपट 'सुलतान'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणा-या सलमानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली आहे, चाहत्यांनीच संताप व्यक्त करत सोशल मिडियावरुन टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 21 - अभिनेता सलमान खान त्याच्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्द आहे. मात्र यावेळी त्याने केलेल्या वक्तव्यावरुन त्याच्या चाहत्यांनीच संताप व्यक्त करत ट्विटरवरुन टीका केली आहे. आगामी चित्रपट 'सुलतान'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणा-या सलमानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली आहे. एका मुलाखतीत बोलताना सलमानने केलेली हा तुलना त्याच्या चाहत्यांना रुचली नाही. सोशल मिडियावरुन सलमानवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
 
मुलाखतीदरम्यान सलमानला 'सुलतान' चित्रपटात कुस्तीपटूची भुमिका निभावणं किती कठीण गेलं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 'सहा तास सलग शुटींग करताना अनेक वेळा मैदानावर उचलणं, आपटणं चालू असायचं. मला हे फारच कठीण गेलं. कारण 120 किलो वजनाच्या व्यक्तीला मला 10 वेळा आणि तेदेखील 10 वेगवेगळ्या अँगलने उचलावं लागायचं. त्याचप्रमाणे मलादेखील उचलून जमिनीवर आपटलं जायचं. ख-या खेळात अशाप्रकारे पुनरावृत्ती केली जात नाही. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं. मला सरळ चालणं शक्य व्हायचं नाही. काहीतरी खायचो आणि ट्रेनिंगसाठी जायचो' असं उत्तर सलमान खानने दिलं. 
 
सलमान खान अनेकदा त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर टिंगल टवाळी करत उत्तर देत असतो. मात्र यावेळी त्याने बलात्कार पिडीत महिलेचा केलेला उल्लेख अनेकांना आवडला नाही. सोशल मिडियावर अनेकांनी सलमान खानवर टीका करत आपला रोष व्यक्त केला. 
 
राष्ट्रीय महिला आयोगाने सलमान खानच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने सलमान खानला सात दिवसांमध्ये असं वक्तव्य का केलं ? याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. अथवा त्याला आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात येणार आहे. 'तो फक्त सलमान खान असल्याने असं वक्तव्य करण्याचा त्याला अधिकार नाही', असं आयोगाच्या प्रमुख ललिता कुमारमंगलम यांनी केलं आहे.
 
 
{{{{twitter_post_id####}}}}