Join us

"योगी आदित्यनाथ यांना सलाम", अभिनेता सुमीत राघवननं केलं यूपीच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 10:48 PM

अभिनेता सुमीत राघवन यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. त्यानं योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ ट्विट करत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

मुंबई-

अभिनेता सुमीत राघवन यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. त्यानं योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ ट्विट करत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. योगी आदित्यनाथ रस्त्यांच्या समस्यांवर रोखठोक मत मांडत आहेत. याचीच भुरळ सुमीत राघवन याला पडली असून त्यानं योगींच्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सुमीन राघवन सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याच्या स्पष्ट भूमिकांमुळे तसंच त्यानं केलेल्या पोस्टचीही नेहमी चर्चा होत असते. यावेळी सुमीतनं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणारं ट्विट केलं आहे. त्यात तो म्हणतो की, "रस्ते, स्पीड ब्रेकर, रोड माफियांबाबत बोलताना एखाद्या राज्याच्या प्रमुखाला मी पहिल्यांदाच पाहातोय किंवा ऐकतोय. त्यांचा नेमका हेतू काय आहे हे योगी आदित्यनाथ यांच्या डोळ्यांमधून आणि आवाजातून स्पष्ट होतं. कोणतीही वायफळ बडबड नाही. शब्दांचा खेळ नाही. योगी आदित्यनाथ तुम्हाला सलाम", असं ट्विट सुमीत राघवन यानं केलं आहे. 

योगी आदित्यनाथ या व्हिडिओमध्ये राज्यातील अनधिकृत स्टँड २४ तासांत हटविण्यात येतील अशा सूचना देत असल्याचं दिसून येतं. "कोणत्याही रस्त्यावर मग तो हायवे असो, एक्स्प्रेस वे असो किंवा मग जिल्ह्यातील कोणताही रस्ता आणि चौक असो. अनधिकृत बस स्टँड, टॅक्सी स्टँड, थ्री व्हीलर स्टँड अथवा कोणतीही अनधिकृत बांधकामं दिसता कामा नयेत. पुढील २४ तासांत आम्ही सर्व अनधिकृत स्टँड्स हटवून टाकू. प्रत्येक रोड माफियाचं कंबरडं मोडून काढू. कुणालाच माफियागिरी करता येणार नाही याची काळजी घेतली जाईल. माफियांची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली तर जनतेचं जगणं मुश्कील होईल. रस्त्याच्या कडेला एकही वाहन उभं राहिलेलं दिसता कामा नये", असं सक्त आदेश योगी आदित्यनाथ देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

टॅग्स :सुमीत राघवनयोगी आदित्यनाथ