Join us  

कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, 'ही सर्वोत्तम सून आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 3:10 PM

कतरिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कतरिनाचे सासुसोबतचे खास बॉन्डिंग पाहायला मिळाले. 

बाॅलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री कतरिना कैफ चाहत्यांच्या मनावर राज्य करते. स्वबळावर तिने बाॅलीवूडमध्ये नाव कमावले आहे. आज सर्वात आघाडीच्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे. चित्रपटांबरोबरच ती तिच्या हळव्या स्वभावामुळे चर्चेत असते. अशातच कतरिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कतरिनाचे सासुसोबतचे खास बॉन्डिंग पाहायला मिळाले. 

अभिनेता विकी कौशल हा त्याच्या 'सॅम बहादूर' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. सॅम बहादूरच्या स्पेशल स्क्रिनिंगला विकीचे संपूर्ण कुटुंब हजर राहिले. यावेळी कतरिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कतरिना कैफ तिच्या सासू आणि सासऱ्यासोबत सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना दिसत आहे. कतरिना गर्दीत तिच्या सासूचे संरक्षण करताना पाहायला मिळते.

हा व्हिडीओ पाहून लोक कतरिना कैफ हिचे काैतुक करताना दिसत आहेत.  एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'ती एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी विदेशी असूनही तिला कोणीही काहीतरी चुकीचे करताना पाहिले नाही. म्हणूनच ती सर्वोत्तम सून आहे'. तर आणखी एकाने लिहले की, 'ती किती शांत आहे... ना ड्रामा, ना ओव्हर अ‍ॅक्टिंग'.

नुकतेच काही दिवसांपुर्वी कतरिनाने सासरे शाम कौशल यांच्या वाढदिवशी खास पोस्ट केली होती. कतरिना आणि तिच्या सासरच्या मंडळीमधील घट्ट नाते अनेकदा दिसून आले आहे. शिवाय, तिचे सासरेही कतरिनाचे कौतुक करताना थकत नाहीत. विकी आणि कतरिनाचे ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न झाले होते.  लग्नानंतरही दोघांमधील प्रेमाचा गोडवा कायम तसाच आहे हे दिसून येतं.

टॅग्स :कतरिना कैफबॉलिवूडविकी कौशलसेलिब्रिटी