साऊथची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu). ती तिच्या प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. खरेतर आज समांथाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. समांथा आणि चैतन्य नागा (Chaitanya Naga) यांची लव्हस्टोरी चित्रपटाच्या सेटवर फुलली, मात्र त्यांचा ४ वर्षांचा सुखी संसार मोडला.
समांथा आणि नागा चैतन्य यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या प्रेमाची संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चा होते आणि ते टॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे होते. दोघांची जोडी केवळ रील लाईफमध्येच आवडली नाही तर खऱ्या आयुष्यातही या जोडप्याचे कौतुक करणाऱ्यांची कमी नव्हती. वास्तविक, दोघांची पहिली भेट २००९ मध्ये 'ये मैया चेसवे' या सुपरहिट चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
२०१४ साली शूटिंगदरम्यान समांथा-नागा चैतन्यमध्ये फुलले प्रेम पहिल्या भेटीनंतर, समांथा आणि नागा चैतन्य यांची २०१४ मध्ये सूर्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकत्र आले. या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात प्रेम फुलले. यानंतर त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगू लागली. २०१६ मध्ये, समांथा आणि नागा चैतन्य सुट्टीवर गेले होते, जिथे नागा चैतन्यने सामंथाला खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. अभिनेत्रीने त्या क्षणांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
२०१७ साली अडकले लग्नबंधनातसमांथा आणि नागा चैतन्य यांच्यातील केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी त्यांच्या लग्नाची अटकळ बांधली. या दोघांनी २९ जानेवारी २०१७ रोजी एंगेजमेंट केली होती. त्याचवेळी ७ ऑक्टोबर २०१७ रोजी दोघांनीही सात जन्म एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली. मात्र, हे नाते केवळ ४ वर्षे टिकले. २ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी विभक्त होण्याची घोषणा करून लाखो चाहत्यांची मने तोडली. हे नाते तुटण्याचे कारण काय होते हे आजतागायत समोर आलेले नाही.