Join us

तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 10:02 AM

'राजकारणापासून माझं नाव बाजूला ठेवा...', समंथाची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्यचा घटस्फोट सर्वात चर्चेत राहिला होता. या जोडीचे अनेक चाहते होते त्यांनाही जबर धक्का बसला होता. लग्नाच्या चार वर्षातच ते वेगळे झाले होते. नुकतंच नागा चैतन्य शोभिता धुलिपालासोबत एन्गेज झाला. यामुळे नागा आणि समंथाच्या घटस्फोटाची पुन्हा चर्चा झाली. त्यातच तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी नागा आणि समंथाच्या घटस्फोटाला बीआरएस प्रेसिडेंट केटी रामा जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर आता नागा आणि समंथा भडकले असून त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे.

काय म्हणाले कोंडा सुरेखा?

नागार्जुनच्या एन कन्वेन्शन सेंटरला तोडलं जाणार नाही त्याबदल्यात समंथाला त्यांनी आपल्याकडे पाठवावं अशी मागणी केटी रामा राव यांनी नागार्जुनकडे केली होती असा दावा कोंडा सुरेखा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केटी रामा राव यांना अभिनेत्रींचं शोषण करण्याची सवय आहे. त्यांनी अनेक अभिनेत्रींना ड्रग्सची सवय लावली आणि त्यांचा फोन टॅप केला. याचाच फायदा घेत ते अभिनेत्रींना ब्लॅकमेल करायचे. 

कोंडा सुरेखा यांच्या या दाव्यानंतर समंथा रुथ प्रभूने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर केली. ती लिहिते, "एकस स्त्री असणं, बाहेर येऊन काम करणं, ग्लॅमरस इंडस्ट्रीत जिथे महिलांना एक वस्तू म्हणून दाखवलं जातं तिथे स्वत: टिकून राहणं, प्रेमात पडणं आणि त्यातून बाहेर येणं तरी पुन्हा उभं राहणं.. या सगळ्यासाठी खूप हिंमत आणि ताकद लागते. कोंडा सुरेखा सर मी या प्रवासातून जी व्यक्ती बनले याचा मला अभिमान आहे. कृपया याला कमी समजू नका. एक मंत्री म्हणून तुमचे शब्द किती महत्वाचे आहेत याचं तुम्हाला गांभीर्य असेल अशी मला आशा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जबाबदार व्हा आणि इतरांच्या प्रायव्हसीचा आदर करा. माझा घटस्फोट हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. याच्यावर तुम्ही मत देऊ नका. आम्ही हे खाजगी ठेवलं याचा अर्थ तुम्ही काहीही तर्क वितर्क लावाल असा होत नाही. आमचा घटस्फोट परस्पर सहमतीने झाला यात राजकारणाचा संबंध नाही. राजकीय भांडणांमधून माझं नाव बाजूला ठेवा ही विनंती. मी नेहमीच अराजकारणी राहिले आणि पुढेही मला तसंच राहायचं आहे."

टॅग्स :समांथा अक्कीनेनीघटस्फोटराजकारणतेलंगणासोशल मीडिया