हजरजबाबी अभिनय आणि कॉमेडीमुळे रसिकांना हसून हसून लोटपोट करण्याचे काम कॉमेडी कलाकार करत असतात. अशाच कॉमेडी कलाकारांमध्ये अभिनेता समीर चौगुलेचे आवर्जून नाव घेतले जाते. सोशल मीडियावरही समीर चौगुले बराच सक्रीय असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी तो संवाद साधत असतो. शिवाय फोटो आणि व्हिडिओसुद्धा तो शेअर करतो.
समीरला चांगलीच लोकप्रियता असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सची नेहमीच इच्छा असते. समीरच्या पत्नीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने यानिमित्ताने त्याचा आणि तिचा एक फोटो शेअर केला असून एक खास संदेश लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की, Happy birthday kavita......काय बोलू!! मला माहितीय फार अलंकारिक लिहिलं की तू बोअर होतेस... इतकंच म्हणतो..आयुष्यात तुझ्याशिवाय माझं अडणं...पान ही न हलणं हे असंच कायम राहू दे.. तुझं असणं = माझं जगणं .... wife's birthday ..My dear wife. Love you forever.....
समीरची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्याची पत्नी ही दिसायला खूपच छान आहे. तसेच तुमची जोडी आम्हाला खूपच आवडली असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
विविध स्कीट्सच्या माध्यमातून समीर रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो.
छोट्या पडद्यावरील विविध मालिका, सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुलेने रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव घराघरात पोहचले आहे. विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुलेने रसिकांची मनं जिंकली आहेत.