अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी)चे माजी अधिकारी समीर वानखेडे मुंबई क्रुज ड्रग्स(Sameer Wankhede) केस प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणात त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह काही जणांना ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. निडर आणि बेधडक कारवाई करणारे अधिकारी अशी ओळख असलेले समीर वानखेडे अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.
'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये अवधूत गुप्ते काही फोटो दाखवतो ज्यावर समीर वानखेडे यांना पहिली प्रतिक्रिया द्यायची आहे. या सेगमेंटमध्ये शाहरुखचा (Shahrukh Khan) फोटो दाखवताच वानखेडे हसतच म्हणतात, 'कोण आहे हा...?' त्यांच्या या प्रतिक्रियेतून दोघांमध्ये किती वाद आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट दिसून येतं. याशिवाय अवधूत त्यांना अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही (Deepika Padukone) फोटो दाखवतात. त्यावर वानखेडे म्हणतात, 'हिला मी पहिल्यांदाच पाहतोय...'.
समीर वानखेडे यांच्यासाठी सेलिब्रिटी कोण याबद्दल सांगताना ते म्हणाले, 'बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ आणि एपीजे अब्दुल कलाम हेच माझ्यासाठी सेलिब्रिटी.' दरम्यान, अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये सेलिब्रिटींसह अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. याबरोबरच अभिनेता श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर हे कलाकारही या शोमध्ये सहभागी झाले होते.